पाकिस्तानची भारताला धमकी, तर आम्ही पण ......

 


मंगळवारी मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आशिया चषक 2023 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नसल्याबद्दल वक्तव्य केले ते म्हणाले "आम्ही आशिया चषकासाठी दुसरे स्थान मागू, कारण आम्ही आम्ही पाकिस्तानला जाणार नाही," त्यांच्या वक्तव्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नाराजी व्यक्त केली असून पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याची भारताला धमकी दिली आहे.

पाकिस्तान मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष रमीज राजा यांच्याशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या व्यक्तव्यामुळे  पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) नाराज असुन 2023 मध्ये भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून पाकिस्तानही आपले नाव मागे घेऊ शकते. मात्र, याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, पीसीबी विविध पर्यायांवर विचार करत आहे, त्यापैकी एक म्हणजे एसीसी पासून वेगळे होणे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वरनेही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली सईद अन्वरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "जेव्हा सर्व आंतरराष्ट्रीय संघ आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी पाकिस्तानात येतात तेव्हा बीसीसीआयला काय अडचण आहे. जर बीसीसीआय  2023 एकदिवसीय विश्वचषक तटस्थ ठिकाणी हलवण्यास तयार असेल तरच पाकिस्तानने देखील 2023 आशिया चषक तटस्थ ठिकाणी  हलवावे.."

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका थांबली आहे. डिसेंबर 2012 मध्ये टी-२० आणि एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली, तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने 2-1 ने जिंकली. पण 2007-08 पासून दोन्ही देशांनी एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने