मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कथित नक्षलवादी विचारवंत आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि त्यांच्या पाच साथीदारांना प्रतिबंधित अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कथित माओवादी संबंध प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली.तसेच दहशतवादविरोधी कायदा UAPA अंतर्गत दोषी आणि त्यावर सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्धच्या त्यांच्या अपीलावर न्यायालयाने हा निर्णय दिला. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
या आरोपींपैकी एक पांडू पोरा नरोटे याचा ऑगस्ट २०२२ मध्ये मृत्यू झाला. महेश तिर्की, हेम केशवदत्त मिश्रा, प्रशांत राही आणि विजय नान तिर्की हे अन्य आरोपी आहेत. या सर्वांना मार्च २०१७ मध्ये गडचिरोली, महाराष्ट्र येथील सत्र न्यायालयाने UAPA च्या कलम 13, 18, 20, 38 आणि 39 आणि भारतीय दंड संहितेच्या 120B अंतर्गत क्रांतिकारी लोकशाही आघाडी (RDF) शी कथित संबंध असल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या सर्वांवर अवैध माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप होता.
टिप्पणी पोस्ट करा