ऋषी सुनक यांचा भारताला धक्का, भारत विरोधी सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावर वर्णी

 


ब्रिटनचे नवे पंतप्रधान किंग चार्ल्स तिसरे यांनी पंतप्रधानपदावर नियुक्ती झाल्यानंतर लगेचच ऋषी सुनक यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना परत सरकारमध्ये जागा मिळाली आहे. त्यापैकी सुएला ब्रेव्हरमन ज्या लिझ सरकारमध्ये गृहमंत्री होत्या. युनायटेड किंगडमच्या गृहमंत्री म्हणून आता पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रेव्हरमन यांनी एका मुलाखतीत भारत सोबतच्या मुक्त करार संबंधी निदान केले होते त्या म्हणाल्या होत्या, भारतासोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण वाढेल आणि ते ब्रेक्सिटच्या विरोधात असेल.

माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री बनलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांना गृह कार्यालयात पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. ट्रस यांना सुएला पायउतार झाल्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांनी केलेल्या बंडानंतर राजीनामा द्यावा लागला. सुएला ब्रेव्हरमन ही मूळची भारतीय आहे. त्यांनी आपल्या मागील कार्यकाळात भारतासोबत झालेल्या व्यापार कराराबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारतासोबत झालेल्या व्यापार करारामुळे ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे ब्रेक्झिटच्या उद्देशालाही हानी पोहोचू शकते, असे त्या म्हणाल्या होत्या.

द स्पेक्टेटर मॅगझिनशी झालेल्या संवादात त्यांनी हे वक्तव्य केले होते. ब्रेव्हरमन यांचे विधान ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या विधानापेक्षा वेगळे होते. भारतासोबतचा व्यापार करार यावर्षी दिवाळीपर्यंत पूर्ण व्हावा अशी लिझ ट्रसची इच्छा होती. परंतु द स्पेक्टेटरला दिलेल्या मुलाखतीत, सुएला ब्रेव्हरमन म्हणाली होती "मला भारतासोबतच्या खुल्या सीमा धोरणाबद्दल चिंता आहे कारण मला वाटते की लोकांनी ब्रेक्झिटची निवड केली तेव्हा  यासाठी मतदान केले नाही."

यूके प्रवासी व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतीय तेथून बाहेर पडत नाहीत, असे ते म्हणाले होते. भारतीयांसाठी अशा प्रकारे सीमा खुली करू नये, असे ते त्या म्हणालया होत्या. सुएला म्हणाली होती की बहुतेक भारतीय प्रवासी व्हिसा संपल्यानंतर यूकेमध्ये राहतात. सुएला यांनी असेही म्हटले होते की, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी काही सूट दिली जाऊ शकते.

सुएला ही भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक आहे. तीचे पालक 1960 मध्ये ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. त्यांच्या कुटुंबाची मुळं भारताशीच जोडलेली आहेत. तिचे वडील क्रिस्टी फर्नांडिस मूळचे गोव्याचे असले तरी आई उमा तमिळ हिंदू कुटुंबातील होती. सुएलाचा जन्म लंडनमध्येच झाला होता. ती ब्रिटिश नागरिक आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने