मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक आयोगाने आज नवीन नाव व निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता शिवसेना हा पक्ष दोन भागात विभागला गेला असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नाव बाळासाहेबांची शिवसेना, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे असेल. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला नवीन मशाल चिन्ह वाटप केले आहे, तर एकनाथ शिंदे गटाकडून चिन्हासाठी परत नवीन तीन पर्याय मागवण्यात आले आहेत.
शिंदे गटाला अद्याप निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला उद्या, ११ ऑक्टोबरपर्यंत तीन नवीन चिन्हांची यादी सादर करण्यास सांगितले आहे.याआधी शिंदे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह दिले होते, परंतु पहिले दोन चिन्हे सारखी असल्याने ती देण्यात आली नाहीत तर गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाने धार्मिक कारणाचा हवाला गदा हे निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले.
निवडणूक आयोगाने 'शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने हा आपला मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, 'पहिल्याच प्रयत्नात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे जिंकले आहेत. याचं कारण म्हणजे आम्हाला जे नाव मिळालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नाव राहिलं. बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव राहिलं. आम्ही तीन जी निशाणी मागितली होती. त्यातली मशाल ही निशाणी आम्हाला मिळाली. त्यामुळे पहिल्या डावात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. म्हणून आम्ही आनंदी आहोत.'
शिंदे गटा शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली नावात आम्ही समाधानी आहोत. बाळासाहेबांची शिवसेना असंच आम्हाला नाव मिळालं आहे. याच नावाने आम्ही पुढे जाऊ. लोकांच्या मनातील नाव आम्हालं मिळालं आहे.
टिप्पणी पोस्ट करा