भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला एकदिवसीय सामना लखनौमध्ये खेळवला जात आहे. 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक देखील सुरु होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ वनडे मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकन संघाचा स्टार अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे.
प्रिटोरियस हा इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या T20 सामन्याचा भाग होता. या सामन्यात प्रिटोरियसच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली. तो T20 विश्वचषक संघाचाही एक भाग होता पण आता तो खेळू शकणार नाही. प्रिटोरियस हा आफ्रिकन संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. यावेळी त्याच्याकडून संघाला मोठ्या आशा होत्या.
इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात प्रिटोरियसने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 30 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 35 विकेट आणि 261 धावा आहेत. याशिवाय त्याने 3 कसोटी सामने आणि 27 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 7 आणि एकदिवसीय सामन्यात 35 बळी घेतले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा