मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक सध्या चर्चेत आली आहे. मनवाने तिच्या कॅब ड्रायव्हरवर गैरवर्तन आणि धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. याबात तिने सांगितले की ती वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून रात्री 8.15 वाजता कॅबने घरी जात होती. ती गाडीत बसल्यावर ड्रायव्हर फोनवर बोलू लागला. अभिनेत्रीने त्याला तसे करण्यास मनाई केली, या मुळे चिडलेल्या ड्रायव्हरने तिच्याशी गैरवर्तन केले. या घटनेने मनवा भयभीत झाली आहे.
मनवा नाईक हिने तिच्या फेसबुक पोस्टद्वारे संपूर्ण घटना कथन केली आहे. तिने लिहिले, 'मी सकाळी 8.15 वाजता उबर कॅबमध्ये बसले होते. उबर चालक फोनवर बोलू लागला. मी त्याला हे करू नकोस असे सांगितले. त्याने बीकेसीच्या सिग्नल तोडला. मी त्याला सांगितले की हे चुकीचे आहे. त्याने ऐकले नाही. वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवून फोटोही काढला.
मनवा पुढे लिहले आहे, 'उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मी हस्तक्षेप केला. मी पोलिसांना त्याला सोडण्यास सांगितले, कारण त्यांनी आधीच त्याच्या कारचे फोटो काढले होते. उबर चालकाला राग आला. आणि तो म्हणू लागला की तू ५०० रुपये भरणार का ? मी म्हणाले तू फोनवर बोलत होतास. त्यानंतर उबर चालकाने मला धमक्या देण्यास सुरुवात केली.
आपल्या पोस्टच्या शेवटी मनवा नाईकने लिहिले की, 'मी त्याला पोलीस स्टेशनला चलण्यासाठी सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने अंधारात उबेर थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनवाने उबरच्या कस्टमर केअरला फोन केला. धोका वाटून तिने आरडाओरडा सुरू केला, त्यानंतर दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने उबरला घेराव घातला. गाडी थांबवल्यानंतर त्यांनी मला सुरक्षित बाहेर काढले. मनवा पूर्णपणे सुरक्षित आहे, पण घाबरलेली आहे.
मनवा नाईक यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि हिंदी टीव्ही शोमध्ये काम केले आहे. मनवाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शो स्पेशल स्क्वाडमधून केली होती. यानंतर ती तीन बहुरियां, बा बहू आणि बेबी सारख्या शोमध्ये दिसली. मनवा नाईकने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा