अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाच्या प्रभावशाली हिंदु नेत्या तुलसी गबार्ड यांनी सोडला पक्ष

 


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. क्रिमियामध्ये ३ अब्ज डॉलर खर्चून बांधलेल्या पुलावर झालेल्या हल्ल्यानंतर पुतिन अधिक आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनने अमेरिकेसह सर्व युरोपीय देशांकडे मदतीची याचना केली आहे. युरोपीय देशांनीही युक्रेनला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेकडून मोठे वक्तव्य आले आहे. रशियासोबत कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा माजी संसद आणि अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाच्या प्रभावशाली नेत्या तुलसी गबार्ड यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड यांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष सोडला आहे. त्यांनी ट्विटरवर हि माहित दिली असून त्याबरोबर पोस्ट केलेल्या संदेशात म्हंटले आहे कि 'डेमोक्रॅटिक हा पक्ष एक प्रकारे काही उच्चभ्रू लोकांच्या ताब्यात असल्याचा आरोप गबार्ड यांनी केला आहे. तसेच  समान विचार असलेल्या लोकांनी आता डेमोक्रॅटिक पक्ष सोडला पाहिजे.' तुलसी गबार्ड ह्या दोन वर्षांपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार देखील होत्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने