राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दावा केला की बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लिम समुदायाचे आहे आणि कोणीही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ते पुढे म्हणाले की, देशातील सर्वच क्षेत्रात अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेचे योगदान आहे. ANI ने याबाबत वृत्त दिले आहे
ते म्हणाले आज सर्वच क्षेत्रात मग ती कला, लेखन, कविता यात सर्वात जास्त योगदान उर्दू भाषेतुन अल्पसंख्याक समुदायाकडून दिले गेले आहे. बॉलीवूडला शीर्षस्थानी नेण्यात मुस्लिम अल्पसंख्याकांचे सर्वाधिक योगदान आहे, असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले "आपल्यासमोर आज जे बॉलीवूड आहे, त्याला सर्वोच्च स्थानावर नेण्यात मुस्लिम अल्पसंख्याकांनी सर्वात जास्त योगदान दिले आहे आणि आपण त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही,"
टिप्पणी पोस्ट करा