दिवाळीच्या काळात ऑनलाइन फसवणूक टाळा नकली जाहिराती पासुन सावधान रहा

 


दिवाळीसण जवळ आला असून, लोकांचा खरेदीचा उत्साह वाढल्यामुळे बाजारात गर्दी वाढली आहे तसेच ऑनलाइन खरेदीत देखील वाढ होत आहे. यातच डिस्कांउंटच्या नावाखाली काही बनावट जाहिरातींचा सुळसुळाट सोशल मिडियावर वाढला आहे अशीच एक जाहिरात तनिष्कच्या नावाने व्हॉट्सअॅपवर व फेसबुक वर लोक शेअर करत आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की ज्वेलरी ब्रँड तनिष्क दिवाळीनिमित्त क्विझद्वारे लोकांना 6000 रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. परंतु आम्ही याची पडताळणी केल्यावर काही वेगळीच माहिती आमच्या समोर आली.

गेल्या काही दिवसांपासून ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या नावाने आलेल्या कथित दिवाळी ऑफरची लिंक व्हॉट्सअॅपवर बिनदिक्कतपणे शेअर केली जात आहे. ते तुमच्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपपर्यंत पोहोचलेही असेल. त्यात नमूद करण्यात आले आहे की, जे एक साधी प्रश्नमंजुषा सोडवतील त्यांना 6000 रुपये जिंकण्याची संधी दिली जाईल.

तनिष्कच्या नावावर असलेल्या agedevastation.cn आणि '.xyz' या वेबसाइट्स सारख्याच दिसतात. व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त अनेक लोक ते फेसबुकवरही शेअर करत आहेत. मात्र या वेबसाइट्स बनावट असल्याचे सत्आय आहे. खरंतर तनिष्क दिवाळीला 6000 रुपये जिंकण्यासाठी अशी कोणतीही ऑफर देत नाहीये. आम्ही  तनिष्कच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली असता तसेच त्यांचे सोशल मीडियावर असलेले अधिकृत खाते तपासले असता, आम्हाला त्यावर  कोणत्याही अश्या दिवाळी ऑफरची माहिती सापडली नाही ज्यामध्ये क्विझद्वारे 6000 रुपये जिंकण्याची संधी दिली गेली होती. खरच अशी ऑफर असती तर तनिष्कच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सोशल हँडल्सवर कळवली असती.

तसेच याबाबत काल स्वत: तनिष्कनेही ट्विटद्वारे सांगितले आहे की, कंपनी अशी कोणतीही ऑफर चालवत नाही.त्यांनी ट्वीटरवर याची माहित दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे " दुर्दैवाने, तनिष्कच्या ऑफर बाबत खोटया गोष्टी पसरवल्या जात आहे, त्यापैकी एकही ब्रँड तनिष्कने जारी केलेला नाही. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्‍ही दिलगीर आहोत आणि लवकरात लवकर याचे निराकरण करण्‍यासाठी आम्‍ही काम करत आहोत."

दिवाळीच्या काळात अश्या फेक लिंक पासुन सावध रहा आपली कोणतही माहिती शेअर करण्यापूर्वी खात्री करा. कंपनीच्या ऑफर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर किवां अधिकृत सोशल मिडिया अकौंटवर चेक करा, किवां त्यांच्या आउटलेटला भेट द्या व आपली फसवणूक टाळा.      

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने