भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेटप्रेमी नेहमीच वाट पाहत असतात. T20 विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला भिडणार आहेत. स्थानिक हवामान खात्याने या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसानंतरही मेलबर्नचे स्टेडियम खेळासाठी सज्ज होईल, अशी आशा चाहत्यांना अपेक्षा आहे
T20 विश्वचषक 2022 मधील सुपर 12 टप्पा शनिवारपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्याच दिवशी इंग्लंडचा सामना मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.
भारत आणि पाकिस्तान सामन्याची चाहत्यांना खूप प्रतीक्षा आहे. मात्र सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे सामना खंडित होण्याची शक्यता दाट आहे. सामन्याच्या दिवशी पावसाची 80 टक्के शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
2007 टी-20 विश्वचषक विजेता असलेला भारत आपल्या मोहिमेची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी संघाने आपली रणनीती तयार केल्याचे रोहित शर्माने आधीच सांगितले आहे. भारतीय खेळाडूही नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत. आज रोहितने स्वतः फलंदाजीचा जोरदार सराव केला आहे. भारताचे सलामीवीर फलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होत आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर संघाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. भारताला 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध तिसरा सामना खेळनार आहे. 6 नोव्हेंबरला भारत सुपर 12 मधील शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळेल. सुपर 12 च्या सर्व सामन्यांनंतर 7 आणि 8 नोव्हेंबरला विश्रांतीचे दिवस ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर ९ नोव्हेंबरला पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. पुन्हा 11 आणि 12 नोव्हेंबरला दोन दिवसांचा विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला आहे. अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा