पुणे जवळ खासगी प्रवाशी बसला आग, सर्व प्रवाशी सुखरूप

 


भीमाशंकर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदेवाडी येथे ही घटना आज पहाटेला सात वाजता घडली आहे. कल्याणवरुन 29 प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक आग लागली असे समजते. सुदैवाने यात कोणतही जीवित हानी झाली नाही प्रवाशी बसला भीषण आग लागल्याची घटना महाराष्ट्रात परत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बसला लागलेल्या आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. ही बस पुर्ण जळून खाक झाली असून बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. बसला जेव्हा आग लागली तेव्हा बसमध्ये तब्बल 29 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने