बाळासाहेबांची शिवसेना 'ढाल तलवार' चिन्ह घेऊन उतरणार निवडणुकीच्या मैदानात.

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे आता शिवसेनेचे दोन भाग झाले असून निवडणूक आयोगाने आज शिंदे गटाला निवडणूक चिन्ह वाटप केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. . आता शिवसेना हा पक्ष दोन भागात विभागला गेला असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नाव बाळासाहेबांची शिवसेना, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे असेल.

निवडणूक आयोगाने कालच उद्धव ठाकरे गटाला नवीन मशाल चिन्ह वाटप केले आहे, तर काल एकनाथ शिंदे गटाकडून चिन्हासाठी परत नवीन तीन पर्याय मागवण्यात आले होते. शिंदे गटाकडून नवीन पर्याय सादर केल्यानंतर आज त्यांना ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेकडून याबाबत समाधान व्यक्त केले गेले. चिन्ह मिळाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार." असे सूचक ट्ववीट केले आहे.     

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने