मी सुद्धा तुमची गाडी विकत घेऊ शकत नाही: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 


जर्मन प्रीमियम कार निर्माता मर्सिडीज-बेंझने मेक-इन-इंडिया अंतर्गत भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक असेंबल कार लॉन्च केली, या लॉन्च सोहळ्याला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, "तुम्ही उत्पादन वाढवाल तरच खर्च कमी होईल." यासोबतच नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, मी सुद्धा तुमची गाडी घेऊ शकत नाही. मी तुम्हाला असे काही प्लांट लावण्याची सुचवतो ज्यामुळे तुम्हाला रिसायकलिंगचा कच्चा माल मिळेल व यामुळे तुमच्या भागांची किंमत सुमारे 30% कमी होईल.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, देशात एकूण 15.7 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. भारत ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 335% वाढ झाली आहे. यासोबतच देशात एक्स्प्रेस-हायवेचा सातत्याने विकास केला जात आहे, त्यामुळे मर्सिडीज कारला भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या काळात चांगला प्रतिसाद मिळेल.

नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय ऑटोमोबाईल् क्षेत्राची उलाढाल सध्या 7.8 लाख कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 3.5 लाख कोटी रुपयांची निर्यात होते. माझे स्वप्न आहे की भारतीय ऑटोमोबाईलचा क्षेत्राची उलाढाल15 लाख कोटी रुपये असावी. यासोबतच नितीन गडकरी म्हणाले की, आमच्या रेकॉर्डनुसार आमच्याकडे १.०२ कोटी वाहने स्क्रॅपिंगसाठी तयार आहेत, ज्यासाठी सध्या फक्त ४० प्रक्रिया युनिट आहेत. ते म्हणाले की, मला विश्वास आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 4 उत्पादन युनिट्स उघडू शकतो, ज्यामुळे वाहन स्क्रॅपिंगला गती मिळेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने