विक्रम वेधा या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी.

 


हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या विक्रम वेधा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे निर्मात्यांची निराशा झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवात ठीक केली होती आणि  सुरवातीलाच 10 कोटींची कमाई केली, सुरवातीच्या आकड्यामुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी निर्मात्यांना आशा होती. मात्र, चौथ्या दिवसापासूनच विक्रम वेधचा वेग कमी होऊ लागला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन घसरत चालले आहे.

विक्रम वेधाने पहिल्या दिवशी 10.58 कोटींच बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केल होते. यानंतर मात्र चित्रपटाच्या कमाईत अनेकवेळा घट झाली, पण दसऱ्याच्या आसपास थोडे वाढलेले कलेक्शन आता मात्र, गेल्या सलग दोन दिवसांपासून घसरत आहे. शुक्रवारी, चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नीचांकी पातळी गाठली आणि दोन आठवड्यांतले सर्वात कमी कलेक्शन केले. त्याचवेळी, शनिवारी विक्रम वेधच्या कलेक्शनमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे,परंतु आतापर्यंतचे एकंदरीत आकडे पाहता हा चित्रपट हिट होईल कि नाही याबाबत शंका आहे.

विक्रम वेधच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशन आणि सैफ अली खान व्यतिरिक्त या चित्रपटात राधिका आपटे देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री जोडीने केले आहे. याचे आतापर्यंतचे  बॉक्स ऑफिस कलेक्शन ₹ 61.11 करोड आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने