केंद्रीय बाल आयोग ने अ‍ॅमेझॉन इंडियाला एका फंडिंग प्रकरणी पाठवली नोटीस

 


नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने अ‍ॅमेझॉन (Amazon) चे ने जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष (Global Senior Vice President) व अ‍ॅमेझॉन इंडियाचे प्रमुख (Country Head)  यांना अ‍ॅमेझॉन इंडिया ने ऑल इंडिया मिशन (All India Mission) या बेकायदेशीर गोष्टीमध्ये (unlawful practices) गुंतलेल्या एनजीओला (NGO)  दिलेल्या निधीबद्दल समन्स बजावले आहे. आयोगाने त्यांना यासाठी १ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, एनजीओ सोशल जस्टिस फोरम, अरुणाचल प्रदेश यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की ऑल इंडिया मिशन नावाची संस्था जी यूएस आणि यूकेमध्ये नोंदणीकृत संस्था असून तो काही बेकायदेशीर गोष्टीमध्ये  गुंतलेली आहे. ती भारतात बेकायदेशीरपणे मुलांचे धर्मांतर करणे हे काम करते 

या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, 'या संस्थेचे भारतभरात 100 हून अधिक अनाथाश्रम आहेत. तक्रारीनुसार, या संस्थेची वेबसाइट आणि सोशल मीडिया पेजेस स्पष्टपणे सांगतात की भारतातील लोकांचे धर्मांतर करण्याचा संस्थेचा  हेतू आहे आणि तक्रारीत असाही दावाही केला आहे कि त्यांनी भारतात विशेषत: ईशान्य भारत आणि झारखंडमध्ये अनेक लोकांचे धर्मांतर केले आहे'

शिवाय, या संस्थेला अॅमेझॉन इंडियाकडून धर्मादाय निधी मिळत असल्याचा आरोप देखील या तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीत असेही लिहिले आहे की अॅमेझॉन इंडियाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नमूद केले आहे की त्यांचे ग्राहक AmazonSmile वर खरेदी करून ऑल इंडिया मिशन संस्थेला समर्थन देऊ शकतात. 

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने या संदर्भात अ‍ॅमेझॉन चे ने जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष व अ‍ॅमेझॉन इंडियाचे कंट्री हेड यांना  समन्स बजावले आहे. आयोगाने त्यांना यासाठी १ नोव्हेंबर रोजी आयोगा समोर हजर राहण्यास सांगितले आहे. असे माहिती  ANI या संस्थेने ट्विटर द्वारे दिली आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने