ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) वजूखाना मध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग (Carbon Dating) होईल कि नाही, या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. हिंदू पक्षाने केलेली कार्बन डेटिंगची मागणी न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे. त्यामुळे हिंदू पक्षाला झटका बसला आहे. आता हिंदू पक्ष आपली मागणी घेऊन उच्च न्यायालयात जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वजूखाना मध्ये सापडलेल्या शिवलिंगाबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. एकीकडे मुस्लीम पक्ष याला झरा म्हणत होता तर दुसरीकडे हिंदू बाजू शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी करत होती. त्याचवेळी दिल्लीच्या राखी सिंह आणि वाराणसीच्या चार महिलांनी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगच्या मागणीबाबत न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात झाली. यावेळी कोर्टात 62 लोक उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला. यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची हिंदू बाजूची मागणी फेटाळून लावली आहे.
या वर्षी मे महिन्यात ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यावर हिंदू पक्षाने दावा केला की मशिदीच्या मध्यभागी एक कथित शिवलिंग सापडले आहे. ज्यावर मुस्लीम पक्षाच्या वतीने केवळ कारंजे असल्याचे सांगण्यात आले. परंतु हिंदू पक्षाने शिवलिंगाच्या तपासासाठी कार्बन डेटिंग तसेच शास्त्रोक्त पद्धतीने तपास करण्याची मागणी केली होती, जेणेकरून त्याचे वय कळू शकेल. विशेष म्हणजे एखाद्या वस्तूचे वय आणि वेळ जाणून घेण्यासाठी कार्बन डेटिंग केली जाते. यावरून २० हजार वर्षे जुन्या वस्तूंचे वय कळू शकते.
टिप्पणी पोस्ट करा