जया बच्चन नातीला म्हणाल्या लग्नाशिवाय तुला मूल झाले तर.......

 


बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) नुकतेच तिच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या, त्या व्हिडिओमध्ये जया बच्चन पापाराझींशी अतिशय उद्धटपणे बोलत होत्या. आता जया बच्चन तिच्या एका विधानामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. जया यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या' मध्ये नव्या हिला बिना लग्नाशिवाय मूल झाले तरी त्यांची काही हरकत नाही अशी भावना व्यक्त केली आहे.

नव्या नवेली नंदा हिच्या 'व्हॉट द हेल नव्या' या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी लग्न आणि नात्याबद्दल हि मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण खूप महत्त्वाचे असते. त्या म्हणालया की, आमच्या काळात आम्ही असे प्रयोग करू शकत नव्हतो, पण आजची पिढी हे करते आहे आणि त्यांनी हे का करू नये? कारण दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी  हे देखील कारणीभूत असते.

जया बच्चन म्हणाल्या की, लग्नाशिवाय तुला मूल झाले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. नव्या नवेली नंदा ही श्वेता बच्चनची मुलगी आहे. श्वेता ही अमिताभ बच्चन आणि जया यांची मुलगी आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने