गेल्या काही काळापासून आपल्या देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment ) वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार आपले आर्थिक उद्दिष्ट (investors financial goals) साध्य करण्यासाठी यामध्ये गुंतवणूक करतात. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात असणारी अस्थिरता आणि चढ-उतारानंतरही गुंतवणूकदारांचा विश्वास म्युच्युअल फंडांवर कायम आहे. वाढती महागाई आणि वाढत्या व्याजदरांमध्ये देखील इक्विटी योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ (investment inflows into equity schemes) वाढल्याचे पाहायला मिळाले.
जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असताल कमी रिस्क प्रोफाइलवर फंड निवडण्याचा सल्ला आहे. कारण सध्या सर्व प्रमुख बाजारपेठांची स्थिती सारखीच आहे. वेगवेगळ्या प्रमुख अर्थव्यवस्था एकमेकांवर प्रभाव टाकत आहेत. बहुतांश प्रमुख अर्थव्यवस्थांना महागाईचा सामना करावा लागत आहे. परंतु नवीन गुंतवणूकदारांनी फक्त एसआयपी (Systematic investment plan) किंवा एसटीपी (Systematic transfer plan) याद्वारेच बाजारात थोडे पैसे गुंतवावेत. सध्या एकरकमी पैसे गुंतवण्याची गरज नाही. जेव्हा बाजारात स्थिरता येईल, तेव्हाच एकरकमी गुंतवणुकीचा विचार करा.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला जबरदस्त फायदे मिळतात. पण, कधीकधी तुम्हाला नुकसान होऊ शकते. याला निगेटिव्ह ग्रोथ म्हणतात. परंतु, तुम्ही जर गुंतवणुकीच्या बाबतीत थोडे सावध राहिल्यास, हा धोका टाळता येऊ शकता.
सध्या इक्विटी मार्केटमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे, आणि एका देशाच्या बाजाराचा दुसऱ्या देशाच्या बाजारावर परिणाम होत आहे. अनेक ग्लोबल शेअरच्या किंमती घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय फंडांचे रिटर्न चांगले नाहीत. पण बाजारातील ही परिस्थिती नेहमीच अशी राहणार नाही. बाजारात आधीच मोठी सुधारणा झाली आहे, आणि आता हळूहळू मूल्यांकन वाजवी होत आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी पैसे आंतरराष्ट्रीय फंडांमध्ये गुंतवलेत, त्यांनी घाबरून निर्णय घेण्याची गरज नाही. त्याऐवजी, जेव्हा जेव्हा बाजारात घसरण होते, तेव्हा एसआयपी टॉप अप करावा.
गुंतवणूकदारान कडून हि चूक गडू शकते, ती म्हणजे चांगली कामगिरी करणार्या योजनेत प्रॉफिट बुक करायचा, परंतु ज्या योजनेत रिटर्न सातत्याने निगेटिव्ह किंवा कमी मिळतो, अशा योजनेत भविष्यात रिटर्न चांगले वाढतील, या आशेने पैसे गुंतवणूक करून ठेवायचे. पण गुंतवणूकदारांनी असे करू नये. ज्या योजनेची कामगिरी सातत्याने वाईट किंवा चांगली नसते, अशा योजनेपासून दूर राहा.
टिप्पणी पोस्ट करा