शरद पवारांच्या बॉलीवूड संदर्भातील वक्तव्यावर भाजपचा पलटवार.

 


बॉलीवूडमध्ये अल्पसंख्याकांचे सर्वाधिक योगदान असल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचा भाजपने निषेध केला. असून राष्ट्रवादीचे आश्रयदाते व्होटबँकेच्या नावाखाली कला आणि सिनेमात फूट का घालत आहेत, असा सवाल भाजपने केला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, दादासाहेब फाळके, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, स्मिता पाटील, माधुरी दीक्षित इत्यादींचे काय?

त्यांनी पुढे लिहिले की, "दहशतवाद्यांना धर्म नसतो, पण कला आणि सिनेमाला एक धर्म असतो पवार साहेब?, ज्या पक्षाचे मंत्री नवाब मलिक डी कंपनीशी संबंध असल्याबद्दल तुरुंगात आहेत त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो," शरद पवारांच्या विधानाला विरोध करताना भाजप नेते राम कदम यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, किशोर कुमार, लता मंगेशकर यांचा उल्लेख केला आणि बॉलीवूडमधील त्यांचे योगदान नाकारता येईल का, असा सवाल देखील केला. त्यांनी लिहले आहे "दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची स्थापना केली. कला किंवा प्रतिभेची समाज आणि धर्माच्या नावावर त्यांना विभागणी करायची आहे का? या कल्पनेमागे काय षडयंत्र आहे?"

काश्मीर फाइल्सचे दिगदर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर ANI चे ट्विट कोट करून प्रतिक्रिया व्यक्त करत लिहले आहे "जेंव्हा मी मुंबईत आलॊ होतो त्यावेळी एसपी हे बादशहा होते. त्यांनी पुढे लिहले आहे की, "कोणत्याही राजाप्रमाणे त्यांच्या पक्षानेही कर गोळा केला. बॉलीवूडमधील अनेकांनी उदारपणे योगदान दिले. त्या बदल्यात त्यांना स्वतःचे राज्य निर्माण करण्याची परवानगी देण्यात आली. मला नेहमीच आश्चर्य वाटते की ते लोक कोण होते. "शरद पवार यांच्या विधानाने त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या."  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने