नवी मुंबईतील कोपर खैरणे परिसरात काल रात्री मोठा अपघात झाला. येथील बोनकोडे गावात शनिवारी रात्री चार मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला. ही इमारत खूप जुनी आणि जीर्ण अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी तेथे राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास 25 वर्षे जुनी इमारत अचानक कोसळल्याचे वृत्त ANI ने दिले आहे. इमारतीत राहणाऱ्या सुमारे 32 लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आले. मात्र इतर आठ जण बाहेर निघत असतानाच इमारत कोसळली.
घटनास्थळी उपस्थित अग्निशमन आणि बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आज सकाळी एक मृतदेह सापडला आहे पण त्याची ओळख पटणे बाकी आहे. आम्ही इमारतीतील लोकांना मृताची ओळख पटवण्यासाठी बोलावले आहे. आमचे पथक बचाव कार्यात गुंतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.पोलिस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी हजर आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा