गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरुन महाविकास आघाडीला आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. या वेळस त्यांनी सांगितले "महाराष्ट्रात उद्योग येऊच नये, यासाठी तर महाविकास आघाडीकडून ही बदनामीची मोहीम नाही ना?, अशी आता शंका येते आहे. आपण महाराष्ट्राला गुंतवणुकीत पुन्हा 'एक नंबर' वर आणू हे मी महाराष्ट्रातील जनतेला आश्र्वस्त करतो."
या पत्रकार परिषदेत त्यांनी बरेच मुद्दे मांडले ते म्हणाले अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत भयानक घटना घडल्यानं कुणीही महाराष्ट्रात येण्यासाठी तयार नव्हतं, गुंतवणूक करायला तयार नव्हतं. महाराष्ट्रातील विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच गेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत २५ हजार कोटींच्या प्रस्ताव आमच्या सरकारनं मंजूर केले आहेत. महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी, तीन लाख कोटींची गुंतवणूक तुम्ही परत पाठवून महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं यांचं मला आश्चर्य वाटतं, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन गेल्याचे उद्धव ठाकरे यांच्या काळात म्हटले होते याचे पुरावे देखील या प्रसंगी फडणवीस यांनी दाखविले. तसेच २३ सप्टेंबर २०२१ रोजीच्या बातमीचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी टाटा एअरबस प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या काळात गेल्याचं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले 'आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपलं राज्य विसरत नाही. मला ज्यावेळी कळलं की गुजरातला जाण्याचा निर्णय टाटा एअरबस करतंय. त्यानंतर मी टाटा कडे जाऊन मी तो प्रकल्प मिहान प्रकल्पात नागपूरला आणा,असं म्हटलं होतं. गुजरात देईल त्याच्यापेक्षा अधिक सुविधा देऊ, असं आश्वासन दिलं होतं. आमचं सरकार बदलल्यावर मी त्या प्रकल्पाच्या प्रमुखांना सागर बंगल्यावर बोलावलं तुम्ही गुजरातला जात असल्याबद्दल विचारलं. महाराष्ट्रातील वातावरण गुंतवणूक करण्यासंदर्भात नसल्याचं त्यांनी सांगितले होते.'
महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. हा प्रकल्प नागपूरला करण्याचा निर्णय घेतल्यानं नंतरच्या सरकारनं या प्रकल्पाबाबत जाणीवपूर्वक चालढकल केल्याचा माझा समज आहे. तसेच सॅफ्रन प्रकल्प देखील मार्च २०२१ मध्ये हैदराबादला गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना या संदर्भात एकही पत्र लिहिलं नाही पण आता आकांडतांडव केलं जात असल्याचं देखील ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा