जगातील सर्वात प्रसिद्ध रत्नांपैकी एक असलेला कोहिनूर हिरा हा क्वीन मदर म्हणून ओळखल्या जाणार्या एलिझाबेथच्या आईसाठी बनवलेल्या मुकुटात बसवलेल्या 2,800 रत्नांपैकी फक्त एक आहे परंतु 105 कॅरेट अंडाकृती आकाराचा हा तेजस्वी कोहिनूर हिरा राणीच्या मुकुटातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. कोहिनूर हिऱ्याचा इतिहास पहिला असता तो सर्वात प्रथम 12-14 व्या शतकातील काकतीयन राजवटीत म्हणजे आताच्या आंध्र प्रदेशात उत्खनात सापडला अशी नोंद आढळते सापडला त्यावेळीस तो 793 कॅरेट्स न असल्याचे मानले जात होते. यानंतर तो 16 व्या शतकात मुघलांच्या ताब्यात होता. नंतर तो पर्शियन लोकांनी ताब्यात घेतला आणि नंतर अफगाणांनी लोकांच्या ताब्यात तो होता असा इतिहास आहे.
शीख महाराजा, रणजित सिंग यांनी अफगाण नेते शाह शुजाह दुर्राणी यांच्याकडून तो भारतात परत आणला.परंतु पंजाबच्या विलयीकरणाच्या वेळी ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला. 1840 च्या उत्तरार्धात,10 वर्षीय महाराजा दुन्जीप सिंग यांना त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता आत्मसमर्पण करण्यास ब्रिटिशांनी भाग पाडल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने हा हिरा ताब्यात घेतला.
त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने हे रत्न राणी व्हिक्टोरियाला भेट दिले. यानंतर प्रिन्स अल्बर्ट याने त्याला पुन्हा कापून पैलू पडण्यास सांगितले आणि राणीच्या मुकुटात हा हिरा बसवण्यापूर्वी 1937 मध्ये प्रथम राणी अलेक्झांड्रा आणि क्वीन मेरीच्या यांच्या मुकुटांमध्ये बसवला गेला. यानंतर 1953 पासून तो राणीच्या मुकुटाचा एक भाग आहे. कोहिनूर हिरा हा ब्रिटिश मुकुटातील दागिन्यांपैकी एक आहे, परंतु इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातील सरकारांनी या हिऱ्यावर वेळोवेळी दावा केला आहे.
8 सप्टेंबर रोजी ब्रिटीश सम्राट राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यानंतर राणीच्या रत्नाच्या भविष्यासाठी कोणतीही योजना राज घराण्यांनी सांगितली नसली तरी, ते यूकेमध्ये राहण्याच्या शक्यतेने भारतातील अनेक ट्विटर वापरकर्त्यांना "कोहिनूर" हा शब्द भारतीय ट्विटरवर ट्रेंड केला होता. हिऱ्याचा परतावा मागण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने हा हिरा परत मागितला होता. तसेच राणी एलिझाबेथ II च्या राज्याभिषेकाच्या वेळी देखील भारताने परत मागणी केली होती. या मागण्यानंतर यू.के.ने सांगितले होते की कोहिनूर हिरा भारताला परत देण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही.
परंतु ब्रिटीशांनी अलीकडेच बेनिन ब्राँझ या नायजेरियन देशाच्या १९व्या शतकात ब्रिटिश सैनिकांनी लुटलेल्या ७२ कलाकृती, नायजेरियन सरकारला परत केली होती. परंतु ब्रिटीश शाहीघराणे भारताला कोहिनुर हिरा परत करण्याची शक्यता खुपच कमी आहे, कारण तो आता त्यांच्या सामर्थ्याचे प्रतिक बनला आहे असे अनेक इतिहास तज्ञ मानतात. असे असले तरी कोहिनुर हिरा हा ब्रिटिशांनी चोरी आणि फसवणुकीद्वारे मिळवला आहे आणि ते सत्य ते नाकारू शकत नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा