भारीच…या जिल्ह्यात कमळाच्या नव्या प्रजातीची निर्मिती, अमेरिकेनं घेतली दखल!

 


ब्युरो टीम:  कमळांवर कृञीम परागीभवन प्रक्रियेतून तयार केलेल्या नवीन प्रजातीने दुसर्‍या वेळी गोलाकार रचनेच्या एकुण तीन कंदांची निर्मिती केली आहे. अहमदनगर शहराजवळील भिंगार येथील निसर्गअभ्यासक व संशोधक शिक्षक जयराम सातपुते यांनी ही किमया केली असून ही जगातील पहिलीच घटना ठरणार आहे. त्यांच्या या नाविण्यपुर्ण संशोधनाबद्दल अमेरिकेतील आयडब्लूजीएस अर्थात इंटरनॅशनल वाॅटर गार्डनिंग सोसायटीचे संशोधक तियान दायके व जस्टीन यांनी ई-मेलद्वारे त्यांचे अभिनंदनही केले आहे.

कमळ व कुमुदिनी या स्वतंत्र कुटुंबातील असल्या तरी त्यांना वाढीसाठी आवश्यक असलेल्या वातावरणात विलक्षण साम्य असते. जलीय वनस्पतींमध्ये निम्फीया अर्थात कुमुदिनी या कुटुंबातील ट्राॅपीकल प्रकारच्या वनस्पतीच केवळ गोलाकार कंदांची निर्मिती करतात. जलीय वनस्पतींच्या न्युलुंम्बो अर्थात कमळ या कुटुंबातील  सर्व वनस्पती पिवळसर लांबट आकाराच्या ट्युबरची निर्मिती करतात. कमळ व कुमुदिनी हे स्वतंञ कुटुंब असुन या दोन्ही प्रजातींमधील मुळांच्या रचनेचे ही गुणवैशिष्ट्ये ठरलेले असुन अद्यापपर्यंत त्यात बदल झाल्याची जगात कुठेही नोंद नव्हती. तसेच कमळ व कुमुदिनी हे स्वतंञ परिवार असल्याने यांच्यात परागीभवन घडणेही अशक्य असते. 

संशोधक सातपुते यांचे कमळ व कुमुदिनी यांच्यातील परागीभवनावरही प्रयोग सुरू होते. तो प्रयोग यशस्वी झाला की नाही हे भविष्यात त्या प्रजातीच्या कमळाच्या फुलाच्या सातत्यपुर्ण निरीक्षणावरून सिद्ध करता येईल, असे सातपुते यांचे मत आहे. तरीही त्यांनी संकरीत केलेली गोलाकार कंद बनवणारी ही कमळाची संकरीत प्रजाती ही जगातील पहिलाच शोध ठरणार आहे. यापुर्वी सातपुते यांनी तयार केलेल्या निम्फिया स्काय जय या कुमुदिनीच्या संकरीत प्रजातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली असुन आंतरराष्ट्रीय स्तरावर असे यशस्वी संशोधन करणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. त्यांच्या या नवीन संशोधनाबद्दल सर्व कमळ-कुमुदिनी संवर्धक व वनस्पतीअभ्यासक त्यांचे विशेष अभिनंदन करत आहेत. 

या बाबत अमेरिकेतील संशोधक म्हणतात...

 "हे आश्चर्यकारक आहे, असे आम्ही आत्तापर्यंत अनुभवलेले नाही किंवा आमच्याकडे आत्तापर्यंत अशा प्रकारची नोंद नाही.खुप छान कार्य केले आहे."  - दायके तिआन व जस्टीन , संशोधक. इंटरनॅशनल वाॅटरगार्डनिंग सोसायटी.अमेरिका

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने