आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. काल राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय परंपरेचं पालन करत अंधेरी येथील पोटनिवडणूक निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपामध्ये मंथन झाल्यानंतर अखेर ऋतुजा लटकें विरोधातील मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात घोषणा आज भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यानंतर भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व् विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
राज ठाकरेंनी पत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे “काल केलेल्या विनंतीली मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार. चांगली, सकारात्मक संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून आम्ही कायमच करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,”
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी नमूद केले आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. परंतु पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे आणि यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतला आहे..
टिप्पणी पोस्ट करा