पुण्यातील ड्रेनेज व्यवस्था बदलणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

 


पुण्यात सोमवारी (17ऑक्टोबर) झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घर, दुकानांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचंही नुकसान झालं. त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपावर सर्वत्र जोरदार टीका होतेय. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी यावर पुण्यातील ड्रेनेज व्यवस्था येत्या काळात बदलणार असण्याचे सांगितले. 

उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांनशी बोलताना यावर भाष्य केले  'पुण्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. सोमवारचा पाऊस दहा वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढून २४ तासांत पडलेला विक्रमी पाऊस आहे. शंभर वर्षातील विक्रमापेक्षा तो थोडा कमी आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेले नियोजन चाळीस वर्षांपूर्वीचे आहे. भाजपची सत्ता पाच वर्षांपूर्वी आली. यापुढे पाण्याचा निचरा लवकर व्हावा यासाठी नव्या ड्रेनेजचे डिझाईन करण्याची व्यवस्था महापालिका निश्चितपणे करेल,' असे फडणवीसांनी नमूद केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने