राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 'सेविका समिती' यांचे नगरमध्ये संचलन

 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा म्हणजेच सेविका समितीने नगर शहरातील  केडगाव ' या शहराच्या उपनगरात, कोजागिरीच्या दिवशी उत्सव आणि संचलन झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी सुरेख रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी ने संचलनाचे स्वागत केले.  संचलनात सहभागी महिला ह्या समितीच्या गणवेश आणि पदावेश सह उपस्थित होत्या. गणवेशातील महिलांसह बाकी महिलांनी देखील या उत्सवात सहभाग नोंदवला. केडगाव शाहू नगर भागातील नागरिकांसाठी  महिलांचे सघोष पथसंचलन हा अनोखा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.

केडगावची शाखा नव्याने सुरू झाली असली तरी तेथील सेविकांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी सौ.मधुबालाताई चोरडिया या यशस्वी उद्योजिका प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या त्यांनी समितीच्या कार्यास शुभेच्छा देऊन सहभागी महिलांचे कौतुक केले. संचालनानंतर समितीच्या विभाग बौद्धिक प्रमुख स्वातीताई रानडे यांनी 'स्वाधीनतेकडून  स्वतंत्रतेकडे' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमात वैयक्तिक गीत सौ.अनघा बिनिवाले यांनी म्हटले तर सांघिक गीत सौ. सुगंधा डिंगरे यांनी सांगितले. यावेळी शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पण झाला. वंदना काळे यांनी प्रास्ताविक केले हेमा गोसावी यांनी आभार मानले.वंदे मातरम या गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने