डेअरी परवान्याच्या नावाखाली 'आईचे दूध' (Breast Milk) विक्रीस भारतात परवानगी नाही

 


डेअरी परवान्याच्या नावाखाली 'आईचे दूध' (Breast/Human Milk) विकल्याप्रकरणी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या नावाने असे कोणतेही उत्पादन विकणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याचे तसेच गरज पडल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. भारतात 'आईचे दूध' विक्रीस परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

आईच्या दुधाच्या व्यावसायिक विक्रीविरोधात सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. FSSAI परवान्याअंतर्गत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या नावावर 'आईच्या दुधाच्या' विक्रीशी संबंधित कोणताही अहवाल आल्यास, साठा जप्त करून परवाना रद्द केला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे. अशा FBOs (Food Business Operators) विरुद्ध FSS कायदा 2006 आणि त्या अंतर्गत नियमांनुसार योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.

जुलै महिन्यात, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अशाच एका कंपनीवर कारवाई केली आणि तिचा परवाना रद्द केला.निओलॅक्टा  (Neolacta / NLPL ) नावाची कंपनी भारतात  'आईचे दूध' (Breast/Human Milk) विकण्याचे काम करत होती. काही नागरिकांनी  या बेंगळुरूस्थित कंपनीवर आक्षेप घेतला होता, त्यानंतर FSSAI ने कारवाई करत तिचा परवाना रद्द केला. 2016 मध्ये स्थापित, NLPL कंपनीला FSSAI च्या कर्नाटक कार्यालयाकडून डेअरी उत्पादनांच्या श्रेणीमध्ये परवाना देण्यात आला होता.

या कंपनीवर कारवाई करताना अधिकाऱ्यांना FSSAI द्वारे प्रतिबंधित साहित्याचा साठाही मिळाला, तो जप्त करण्यात आला. निओलॅक्टा कंपनीला FSSAI कार्यालयाने आपली सर्व उत्पादने तात्काळ बाजारातून काढून घेण्यास सांगितले होते. आता पुन्हा एकदा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, देशात आईच्या दुधाचे व्यापारीकरण होऊ दिले जाणार नाही. निओलॅक्टा कंपनी 300 मिली फ्रोझन ब्रेस्ट दुधा साठी 4,500 रुपये आकार होती 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने