बेलारशियन एलेस बिलियात्स्की (Byalyatski) व रशिया, युक्रेनच्या मानवाधिकार संघटनांना शांततेचे नोबेल.

 


शांततेच्या नोबेल पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. बेलारशियन मानवाधिकार अधिवक्ता एलेस बिलियात्स्की (Byalyatski) तसेच रशिया आणि युक्रेनच्या मानवाधिकार संघटनांना संयुक्तपणे हा सन्मान देण्यात आला आहे. याआधी गुरुवारी फ्रेंच लेखकाला साहित्य क्षेत्रातील नोबेल प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार पहिल्यांदा 1901 मध्ये सुरू करण्यात आला.

ओस्लो येथे शांतता पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. नॉर्वेच्या नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रेस-अँडरसन (Berit Reiss-Andersen) यांनी या पुरस्काराची घोषणा केली. तुरुंगात डांबलेल्या बायल्यात्स्की (Byalyatski)च्या सुटकेसाठी त्यांनी बेलारूसलाही आवाहनही केले. मात्र, हि घोषणा आज आपला ७० वा वाढदिवस साजरा करत असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात केली आहे का याचे उत्तर देताना अँडरसन म्हणाले, 'हा पुरस्कार नेहमी कुणाला तरी कशासाठी दिला जातो आणि कुणाच्या विरोधात नाही.' गेल्या वर्षी जुलैमध्ये बेलारूसच्या सुरक्षा पोलिसांनी मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकिलांच्या घरांवर छापे टाकले होते. पुरस्कार देणाऱ्या समितीने म्हटले आहे की, 'युद्ध गुन्हे, मानवी हक्कांचे शोषण इत्यादी बाबतीत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.'

नोबेल पुरस्काराची घोषणा सोमवार, ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. यावर्षीचा पहिला पुरस्कार वैद्यकीय जगतातील निअँडरथल डीएनएचे रहस्य शोधणाऱ्या शास्त्रज्ञ वांटे पाबो यांना देण्यात आला आहे. यानंतर मंगळवारी भौतिकशास्त्रात तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आपल्या संशोधनात लहान रेणू जरी वेगळे असले तरी त्यांच्यात एक संबंध आहे हे सिद्ध केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने