आचार्य चाणक्य यांनी धर्म, राजकारण, समाज, पैसा अशा विविध विषयांबद्दल आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथात तपशीलवार विवेचन केले आहे. लोकांच्या वागणुकीबाबतही त्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनीही सांगितले की, आयुष्यात या तिन प्रकारच्या लोकांची कधीही मदत करू नका. चला तर मग जाणून घेऊया ते तीन लोक कोण आहेत ज्यांना कधीही मदत करू नये.
आचार्य चाणक्य म्हणतात की दुष्ट स्वभावाच्या स्त्रिया, चारित्र्यहीन स्त्रिया आणि इतरांचा अपमान करणार्या स्त्रियांना कधीही मदत करू नये. जर तुम्ही अशा कोणत्याही महिलेला मदत केली तर ती त्याचा तुमच्या विरुद्ध वापर करेल.जर तुम्ही अशा स्त्रीला दयाळूपणे मदत कराल तर ते तुम्हाला कदाचित भारी पडेल. अशी महिला समाजासाठी विषारी सापा पेक्षा कमी नाही. अशा स्त्रियांचे गुण त्यांच्या मुलांमध्येही देखील दिसून येतात. अशा स्त्रीला फक्त पैसा आणि सत्तेत रस असतो. ती गरजेच्या वेळी तुमच्या मदतीला कधीच येणार नाही.
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की मुर्खाला उपदेश करणे म्हणजे आपल्या वेळेचा अपव्यय करणे आहे. मूर्ख नेहमी तुम्हला तर्काने पराभूत करण्याचा प्रयत्न करतो. जरी तुम्ही त्याच्या भल्यासाठी बोलत असाल तरी तो तुमचा प्रत्येक शब्द त्याला त्याच्या अहंकारावर घाव घातल्या सारखा भासेल आणि तो तुम्हाला शत्रू बनवेल. अशा लोकांशी बोलून तुम्हाला मानसिक तणाव होईल. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा.
आचार्य चाणक्य यांनी सांगितले की जो माणूस बुद्धिमान असतो त्याला समाधानी कसे राहायचे हे देखील माहित असते. याउलट, तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे नेहमी दुःखी असतात आणि नेहमी शोक करत असतात. असे लोक त्यांच्याकडे असलेला आनंद देखील घेऊ शकत नाहीत आणि नेहमी तक्रार करत असतात. असे लोक विनाकारण दुसऱ्याला त्रास देतात, ते इतरांच्या आनंदाचा हेवा करतात आणि त्यांच्याबद्दल वाईट भावना बाळगतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे कारण ते फक्त दुःखी असल्याचे भासवतात परंतु तुम्हाला नकारात्मक वातावरणात नेऊन तुमच्यात देखील नकारात्मकतेची भावना वाढवतात.
टिप्पणी पोस्ट करा