आचार्य विष्णुगुप्त चाणक्य अर्थात आचार्य चाणक्य जे मौर्य वंशाचे राजकीय गुरू होते त्यांचे नीतीशास्त्र (Chanakya Niti) हे आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारे एक प्रभावी मार्गदर्शिका आहे. ते आजच्या युगातही योग्य मार्गाने जीवनातील आव्हानांशी सामना करायला शिकवणारे नीतीशास्त्र आहे. 2500 इ.स.पू आचार्य चाणक्यांनी अर्थशास्त्र, लघु चाणक्य, वृद्ध चाणक्य, चाणक्य-नीती शास्त्र लिहिले असून आजही आपल्या जीवनात याचे खूप महत्व आहे.
सुखी घर आणि कुटुंबासाठी माणसाच्या जीवनात अनेक गोष्टींचा वाटा असतो. यामध्ये कुटुंबाशी संबंधित लोक आणि त्यांच्याशी संबंधित काम खूप महत्त्वाचे आहे. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात या बद्दल बरेच काही सांगितले आहे. आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांनी चाणक्य नीतीच्या शास्त्रत एक श्लोक नमूद केला आहे ज्यात त्यांनी घरात नेहमी सुख कसे राहील याबाबत खुलासा केला आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...
सानन्दं सदनं सुताश्च सधिय: कांता प्रियालापिनी इच्छापूर्तिधनं स्वयोषितिरति: स्वाज्ञापरा: सेवका:।
आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो: संगमुपासते च सततं धन्यो गृहस्थाश्रमः।।
याचा अर्थ असा आहे ज्या गृहस्थाचे मुले-मुली उत्तम बुद्धीचे, ज्याची पत्नी मृदुभाषी आहे, म्हणजेच गोड बोलणारी आहे. ज्याच्याकडे कठोर परिश्रम करायची तयारी आहे, जाच्याकडे प्रामाणिकपणाने कमावलेला पैसा आहे, जोडीला चांगले मित्र आहेत, आपल्या पत्नीवर प्रेम असून तिच्या बद्दल आपुलकी आहे, तसेच त्याचे सेवक आज्ञाधारक आहेत.
अश्या व्यक्तीच्या घरी पाहुण्यांचा आदर केला जातो, परोपकारी देवाची पूजा केली जाते, घरामध्ये दररोज मिष्टान्नाची व्यवस्था केली जाते, जिथे सज्जनांचा निवास किंवा सहवास मिळण्याची संधी नेहमी असते, असा गृहस्थांचा आश्रम (घर) धन्य आहे, तो व्यक्ती स्तुतीस पात्र आहे. अशा प्रकारे आचार्यांनी आदर्श गृहस्थाचे स्वरूप काय असावे हे या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा