DGP जेलची निर्घृण हत्या, आधी गळा दाबला, नंतर बाटलीने कापला, जाळण्याचाही प्रयत्न.

 


जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) एच के लोहिया यांचा मृतदेह सोमवारी रात्री उशिरा उदयवाला येथील त्यांच्या मित्राच्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला. प्राथमिक तपासानुसार लोहिया यांचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. त्याचबरोबर मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार असलेल्या घरातील नोकरावर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा लोहिया यांचे पार्थिव जम्मूतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आणि जसीर नावाच्या त्याच्या घरगुती नोकराला पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या नोकर फरार आहे. याबाबत अधिक माहिती देताना सिंह म्हणाले की, संशयिताने 57 वर्षीय लोहिया यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. ऑगस्टमध्ये लोहिया यांची केंद्रशासित प्रदेशातील तुरुंग महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याने लोहिया यांचा आधी गळा दाबला आणि केचपच्या तुटलेल्या बाटलीचा वापर करून त्यांचा गळा चिरला, नंतर मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला. निवासस्थानी उपस्थित असलेल्या रक्षकांना लोहिया यांच्या खोलीत आग लागल्याचे दिसले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने