Diwali 2022: दिवाळीत अशा वस्तू घरात राहतील तर लक्ष्मीची अवकृपा होईल.

 


यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. दिवाळीपूर्वी सर्वजण आपल्या घराची साफसफाई करत असतातच. शास्त्रानुसार दिवाळीत साफसफाई करताना वास्तुची विशेष काळजी घेतली पाहिजे. घराची साफसफाई करताना हे लक्षात ठेवा की जर घरात अशा खालील पॆकी कोणत्याही गोष्टी दिसल्या तर त्याची योग्य विल्हेवाट लावा किंवा लगेच घराबाहेर फेकून द्या. अशा वस्तू घरात असतील तर लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते 

तुटलेली भांडी: तुटलेली किंवा तडकलेली भांडी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नका. शास्त्रानुसार दिवाळीत तुटलेली भांडी घरात असणे शुभ मानले जात नाही. त्यांची विक्री करा किंवा नवीन खरेदी करा.

बंद घड्याळ: दिवाळी जीवनात आनंद आणि चांगली वेळ घेऊन येते. अशा परिस्थितीत घरात कोणतीही वाईट घटना घडू नये म्हणून घरात पडलेले बंद घड्याळ असेल तर बाहेर फेकून द्या किंवा ते सुरू करा.

इलेक्ट्रिक वस्तू: दिवाळीत घर उजळून निघते. घरातील प्रकाश हे दीपोत्सव आणि माँ लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत घरातील दिवे आणि बल्ब खराब असल्यास ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. दिवाळीत लक्षात ठेवा की घरातील कोणत्याही ठिकाणी प्रकाश नसेल तर लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते. 

फाटलेले शूज आणि चप्पल: बरेच लोक फाटलेले जुने जोडे आणि चप्पल घरात ठेवतात, जे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. फाटलेल्या पादत्राणांमुळे घरात नकारात्मकता येते. दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी अशा वस्तू घराबाहेर ठेवा.

भग्न मूर्ती: देवतांच्या भग्न मूर्तींची कधीही पूजा करू नये. यामुळे वास्तुदोष वाढतात. दिवाळीच्या दिवशी तुटलेल्या मूर्ती पाण्यात टाकून नवीन मूर्ती घरात बसवा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने