Diwali : धनत्रयोदशीला पूजेसाठी नवीन झाडू विकत घेतल्यानंतर, या चुका टाळा

 


दिवाळीपूर्वी धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी रविवार, 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरात सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतो. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी इतर गोष्टींची खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. विशेषत: धनत्रयोदशीला झाडू खरेदी करतात, पण नवीन झाडू विकत घेतल्यानंतर जुन्या झाडूचे काय करायचे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो व चूक होते, आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला होता. शास्त्रानुसार भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन अवतरले होते. धनत्रयोदशीला धन्वंतरी देवासोबतच लक्ष्मी आणि कुबेर देवांचीही पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी महालक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची कृपा घरात राहावी यासाठीच सोने, चांदी आणि भांडी अशा वस्तू खरेदी करण्याचा प्रगाथ आहे.

धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अतिशय शुभ आहे. या दिवशी सोने, चांदी, पितळेची भांडी खरेदी करण्यासोबतच घरात नवीन झाडू आणावा. शास्त्रात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. जर कोणी आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करा. असे मानले जाते की झाडू घेतल्याने नकारात्मक शक्ती पळून जाते आणि घरात सकारात्मक शक्ती येते. झाडूलाही घरामध्ये सुख-समृद्धीचा कारक मानला जातो.

धनत्रयोदशीनंतर आणलेल्या झाडूची  दिवाळीला पूजा करावी यानंतर घरातील कोणत्याही कामासाठी जुन्या झाडूचा वापर करू नये. जुने झाडू तुम्ही  दिवाळीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी घरा बाहेर काढू शकता. याशिवाय नवीन झाडू आणल्यानंतर त्यात पांढरा रंगाचा धागा बांधावा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा राहील आणि घराची आर्थिक स्थिती स्थिर राहील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने