Diwali : कोण आहे अलक्ष्मी ?, का करू शकते तुमच्या घरात निवास ?

 


दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. सर्वजण सध्या आपल्या घराची साफसफाई करण्यात व्यस्त आहेत तसेच आपले घर सजवत आहेत, जेणेकरून देवी लक्ष्मी आनंदाने आपल्या घरी येईल, परंतु या काळात जर तुम्ही घरात स्वच्छता ठेवली नाही तर देवी लक्ष्मी अस्वस्थ होऊन परत जाईल हे लक्षात असु द्या. जर घर स्वच्छ नसेल तर देवी लक्ष्मीची मोठी बहीण 'अलक्ष्मी' तुमच्या घरात वास करेल. देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी तिच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आज तुम्हाला आम्ही अलक्ष्मीची बाबत माहिती देत आहोत

पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी, अलक्ष्मी जी देवी लक्ष्मीची मोठी बहीण मानली जाते ती आधी प्रगट झाली. 'अलक्ष्मी'ला 'ज्येष्ठ लक्ष्मी' असेही म्हटले जाते आणि तिचे स्वरूप देवी लक्ष्मीच्या विरुद्ध असल्याचे म्हटले जाते. माता लक्ष्मीकडून आपल्याला पराक्रम, विजय, वर, धन, सुख आणि समृद्धी मिळते. याउलट, अलक्ष्मीला दुःख, संकट, उष्णता, दारिद्र्य, अपयश इत्यादींची देवी म्हटले जाते. असे मानले जाते की अलक्ष्मीच्या जन्माच्या वेळी तिला कोणत्याही देवी किंवा देवतेने दत्तक घेतले नव्हते आणि भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार तिने अशा ठिकाणी निवास केला जेथे लोक आपापसात भांडतात, जिथे स्त्रियांचा आदर होत  नाही, जिथे घरात आई आणि वडिलांचा आदर नाही, जिथे मद्यपान सेवन होते. 

पौराणिक कथेनुसार, अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनीशी झाला होता. लग्नानंतर जेव्हा ऋषी अलक्ष्मीला घेऊन आश्रमात पोहोचले तेव्हा अलक्ष्मीने आश्रमात जाण्यास नकार दिला. ऋषीनी कारण विचारले असता अलक्ष्मीने तेथे स्वच्छता असून शांत वातावरण असल्याचे सांगितले, आणि ती अशा ठिकाणी राहू सकट नाही हे स्पष्ट केले. ती म्हणाली आशा स्वच्छतेच्या ठिकाणी जेथे रोज पूजा केली जाते त्या ठिकाणी तिची बहीण देवी लक्ष्मीच निवास करू शकते. 

astrozoom चे ज्योतिषी पंडित संदीप यांनी सांगितले की, केवळ दिवाळीच्या रात्रीच नव्हे तर दररोज स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण जिथे घाण नसते तिथेच देवी लक्ष्मी निवास करते. याशिवाय घरात चांगले वातावरण ठेवायला हवे. ज्या घरांमध्ये रोज भांडणे होतात तिथे देवी लक्ष्मी थांबत नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने