Diwali: या वर्षी दिवाळीचा कोणता सण कधी आहे जाणुन घ्या.

 


दिवाळी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा उत्साहाचा अन मांगल्याचा सण जवळ आला असून, दसऱ्याच्या 20 दिवसानंतर दिवाळी सुरु होते. तसे पाहता दसऱ्या नंतरच दिवाळीसाठीची जय्यत तयारी घराघरात सुरू असते. घराची डाग-डुजी, स्वच्छता, रंगकाम, दिवाळीची खरेदी,आकाश कंदील लावणे. हि कामे आता सुरु झाली असतीलच  दिवाळीचा सण हा 6 दिवसाचा सण आहे. हा सण वसुबारस पासून सुरू होऊन भाऊबीज पर्यंत साजरा केला जातो. या सणामध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-पूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात. चला मग जाणून घेऊ यावर्षी कोणत्या दिवशी कोणता सण आपण साजरा करणार आहोत. 

वसु बारस यावर्षी दिनांक 21-10-2022 शुक्रवार रोजी दिवाळी सुरु होत वसु बारस असून हा सणाचा पहिला दिवस आहे. या दिवशी गाय आणि त्याचा वासराची पूजा केली जाते. बायका उपवास धरतात आणि संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करूनच उपवास सोडतात. गवारीची भाजी, बाजऱ्याची भाकर आणि गूळ असा नैवेद्य असतो. आपल्या घरात सौख्य नांदावे यासाठी ही पूजा करतात. तसेच घरात लक्ष्मी आगमन व्हावे या हेतूने देखील गाय वासराची पूजा करतात. घरात या दिवसा पासून दिवे लावण्यास सुरुवात होते. दर रोज सडा-रांगोळी करतात.

धनत्रयोदशी यावर्षी दिनांक 22-10-2022 शनिवार रोजी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवस आहे. कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस साजरा करतात. या दिवशी खरेदी करणं शुभ मानतात. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवसायाची नवी पुस्तके बनवतात आणि त्याची पूजा करतात. या दिवशी सोनं, चांदी, नवे कपडे, भांडे, धणे, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, खेळणी, साळीच्या लाह्या-बत्ताशे इत्यादी विकत घेतात. या दिवशी लक्ष्मी, गणेश, कुबेर, धन्वंतरी आणि यमराजाची पूजा केली जाते. कोरडे धणे आणि गुळाचा नैवेद्य असतो. या दिवशी यम दीपदान करतात.

नरक चतुर्दशी यावर्षी दिनांक 24-10-2022 सोमवार रोजी आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी सुवासिक तेल लावून उटण्याने स्नान करतात. यमासाठी दीपदान करतात. या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करतात आणि घरातील पुरुष मंडळींना स्नान करताना दिवे ओवाळतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याचा प्रीत्यर्थ नरकचतुर्दशी साजरी करतात. असे म्हणतात की या दिवशी जो कोणी सूर्योदयाच्या पूर्वी उठून अभ्यंग स्नान घेत नाही त्याला नरकाच्या त्रास भोगावा लागतो. या दिवशी सकाळी दिवे लावतात जेणे करून वाईट आसुरी शक्तींचा नायनाट होवो. संध्याकाळी दुकानात घरात, कार्यालयात दिवे लावतात. 

लक्ष्मी-पूजन यावर्षी दिनांक 24-10-2022 सोमवार रोजी आश्विन अमावास्येला सुरवात होत असून याच दिवशी संध्याकाळी ही पूजा करावी. या दिवशी लक्ष्मी देवी अस्तित्व सर्वत्र असते, आणि ती स्वच्छ, योग्य असे स्थळ आपल्या वास्तव्यास शोधते. या दिवशी रात्री श्री गणेश, लक्ष्मी देवी आणि देवी सरस्वतीची पूजा करतात. अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक वर लक्ष्मी स्थापित करून पूजा करतात. पंचामृत, साळीच्या लाह्या-बत्ताशे, धणे-गूळ, अनारसे, फळे यांचा नैवेद्य दाखवतात  या दिवशी नाणी, सोनं, चांदीची पूजा देखील करतात. रात्री फटाके उडवतात. व्यावसायिक किंवा व्यापारी वर्ग आपल्या दुकानाची पूजा करतात. मुले फुलबाज्या उडवून आपला आनंद साजरा करतात.

पाडवा यावर्षी दिनांक 26-10-2022 बुधवार रोजी दिवाळीचा पुढचा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला असून यालाच  बळीप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा असे ही म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. या दिवशी व्यापारी वर्ग नवं वर्षाची सुरुवात करतात. बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्यांची पूजा करतात. तसेच नवीन कामाला सुरुवात करतात. याच दिवशी राजा बळीचे गर्वहरण श्री विष्णूनी वामनरूप धरुनी केले होते. या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या वडीलधारी करता पुरुषाला औक्षण करतात. स्त्रिया आपल्या नवऱ्याला वडिलांना, सासऱ्यांना औक्षण करते. नवरा, वडील, सासरे तिला काही भेट वस्तू देतात. तसेच मुली देखील आपल्या वडिलांचे औक्षण करतात.

भाऊबीज यावर्षी दिनांक 26-10-2022  बुधवार रोजी दिवाळीची सांगता होत असून याच दिवशी भाऊबीज आहे. हा सण खास भाऊ बहिणीचा आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला ज्याला यम द्वितीया असे ही म्हणतात त्याच दिवशी हा सण साजरा करतात. बहिणी या दिवशी संध्याकाळी चंद्राची कोर बघून आधी चंद्राला नंतर भावाला ओवाळते. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो.या मागील उद्देश असा आहे की भाऊ चिरंजीव व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी. भाऊ आपल्या बहिणीला यथाशक्ती भेटवस्तू देतो. ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या चंद्राला ओवाळतात. अश्या प्रकारे हा दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने