दिवाळी हा एक सण आहे, जो वसूबारस पासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो. दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. यावर्षी धनत्रयोदशी रविवार, २३ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरी केली जाणार असून. या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरात सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतो.
धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झालाअसे मानतात. शास्त्रानुसार भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन अवतरले होते. धनत्रयोदशीला धन्वंतरी देवासोबतच लक्ष्मी आणि कुबेर देवांचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ असते असे देखील मानले जाते. या दिवशी खरेदी केल्याने आर्थिक अडचण दूर होते. तर चला जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ आहे.
सोने: धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, सोने खरेदी करायचे नसेल तर अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी किंवा पितळेची भांडी खरेदी करणे देखील शुभ असते.
श्री यंत्र: धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र अवश्य खरेदी करा, कारण दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. हे यंत्र माँ लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे.
नाणे: धनत्रयोदशीला चांदीची नाणी खरेदी करणे शुभ मानले जाते. बाजारातून एखादे नाणे विकत घेताना त्यामध्ये माँ लक्ष्मी आणि गणेश कोरलेले असावे. असे नाणे घरात ठेवणे शुभ मानले जाते.
चांदीची भांडी: धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची भांडी खरेदी करणे खूप शुभ असते. त्यामुळे घरात शांतता नांदते. चांदीचा संबंध चंद्राशी आहे. अशा परिस्थितीत या दिवशी चांदीची भांडी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
भांडी: भगवान धन्वंतरी जन्माच्या वेळी अमृत कलश धारण करत होते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. भांडी व्यतिरिक्त सोने-चांदीसारख्या कोणत्याही धातूच्या वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
झाडू: झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. असे केल्याने गरिबी दूर होते. घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच दिवाळीच्या दिवशी झाडू पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
टिप्पणी पोस्ट करा