दिवाळी सणानिमित्त खरेदी करणे ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. या काळात खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीचा सण उद्या पासून सुरु होत आहे. दिवाळीच्या दिवसात खरेदीला लक्ष्मी देवीचा विशेष सहवास मानला जातो. असे म्हटले जाते की अशा वेळी योग्य ती गोष्ट घेतल्याने नशीब बदलतेच, शिवाय देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा आपल्यावर वर्षभर टिकून राहतो. चला मग जाणून घेऊया की ज्योतिषशास्त्रानुसार या दिवाळीत कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी कोणत्या गोष्टी शुभ राहतील...
मेष : या दिवाळीत चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात. ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
वृषभ : या दिवाळीत तुमच्या राशीच्या लोकांनी सोने, चांदी किंवा हिऱ्याच्या वस्तू खरेदी कराव्यात.
मिथुन : या राशीसाठी दिवाळीत सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ राहील. जर तुम्ही घरात चांदीचा गणपती आणलात तर ते तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल.
कर्क : तुमच्या राशीच्या लोकांसाठी या दिवाळीत श्रीयंत्र खरेदी करणे फायदेशीर ठरेल, यामुळे महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यास तुम्हाला मदत होईल. याशिवाय तुम्ही चांदीचा कलश किंवा शिवपार्वतीची चांदीची मूर्ती देखील खरेदी करू शकता.
सिंह : या राशीच्या लोकांसाठी दीपावलीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ राहील, परंतु जर यात काही अडचण असेल तर तुम्ही तांब्याशी संबंधित वस्तू देखील खरेदी करू शकता. दिवाळीत सोन्याची नाणी आणि दागिने खरेदी करणे फायदेशीर ठरेल.
कन्या : दिवाळीच्या दिवशी हस्तिदंताच्या वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही देवी दुर्गाला चांदीचे छत्रही अर्पण करू शकता.
तूळ : या दिवशी सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय गुलाबी कपडे खरेदी केल्याने समृद्धी वाढेल.
वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी तांब्याच्या वस्तू खरेदी करणे फायदेशीर ठरेल.
धनु : दिवाळीत वाहन खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय चांदीच्या खरेदीमुळेही घरात समृद्धी येईल.
मकर : या राशीच्या लोकांसाठी वाहन आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. हे शक्य नसेल तर किमान स्टील किंवा घराच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करा.
कुंभ : या दिवाळीत चांदीच्या वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मीन : या दिवाळीत तुम्ही चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी करू शकता. याशिवाय दिवाळीच्या दिवशी पिवळे कपडे घालणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा