Diwali: जाणुन घ्या धनत्रयोदशी महत्व, मुहूर्त व पूजा पद्धती


 आज २२ ऑक्टोबर २०२२ अर्थात दिवाळीचा दुसरा दिवस आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हा आयुर्वेदाचा प्रवर्तक आणि देवांचा चिकित्सक मानला जातो. पारंपारिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनामुळे धन्वंतरी देवता आज त्रयोदशीला अवतरले. शरद पौर्णिमेला चंद्र, कार्तिक द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी, चतुर्दशीला काली माता, अमावस्येला देवी लक्ष्मी महासागरातून अवतरली असे मानले जाते म्हणून ६ दिवस दिवाळी साजरी करतात.

दीपावलीच्या दोन दिवस आधी त्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. भगवान धन्वंतरी हे सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देणारे आणि दारिद्र्य दूर करणारे आहेत आज धनतेरस पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:10 वाजल्यापासून ते  08:24 वाजेपर्यंत आहे  धनत्रयोदशी पूजा करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर गणेशजींचे अवाहन करून धन्वंतरी देवाची षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी. तसेच देवी लक्ष्मीची देखील पूजा करावी. यानंतर गणेश, भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करा.

धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाने दिवा दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असून या दिवशी यमराजासाठी पिठाचा चारमुखी दिवा बनवून घरातील मुख्याजवळ ठेवा. या दिव्याचे मुख दक्षिणेकडे असते. दीप प्रज्वलित करताना दक्षिण दिशेला तोंड करून‘मृत्युनां दण्डपाशाभ्यां कालेन श्यामया सह। त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम्’  या मंत्राचा जप केला जातो.

सहा दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात काल वसुबारस पासून झाली आहे, आज  धनत्रयोदशीचा दुसरा दिवस आहे. या ६ दिवसीय उत्सवात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दीपावली, पाडवा आणि भाऊबीज हे उत्सव साजरे केले जातात. या सहा दिवसांच्या उत्सवात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने