Diwali 2022 Shubh Muhurat दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरी केली जाते. दिवाळी, या वर्षी सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान राम लंका जिंकून अयोध्येत आले, ज्यांच्या आनंदात सर्व नगरवासींनी आपल्या भगवान रामाचे स्वागत करण्यासाठी दिवा लावला. पुराणानुसार, कार्तिक महिन्याच्या अमावास्येला समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी झाला होता. या दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी, कशी करावी आणि पूजेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.
लक्ष्मी-गणेश पूजेसाठी शुभ मुहूर्त - 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 06:54 ते 08:16
लक्ष्मीपूजनाच्या आधी संपूर्ण घराची साफसफाई करा. घरात गंगाजल शिंपडा. संपूर्ण घर फुलांनी आणि दिव्यांनी सजवा. मुख्य दरवाजा फुलांनी आणि तोरणांनी सजवा, मुख्य दरवाजावर रांगोळी काढा. पूजेच्या ठिकाणी पाट ठेवा. त्यावर लाल कपडा घालून तेथे लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती स्थापित करा. जवळ पाण्याने भरलेला कलश ठेवा. यानंतर नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेच्या वेळी पाटावर बसावे. तेल वात घातलेली समई प्रज्वलित करून स्वतःला गंध लावून पूजेला पुढील प्रमाणे आरंभ करावा.
सर्वप्रथम आचमन करावे.
हातात पाणी घेऊन फक्त दोनदा आचमन करा. नंतर भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे (ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम:) उच्चारून एकेक आचमन करा. त्यानंतर चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून उच्चारा.
ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: ।ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: । ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।
यानंतर प्राणायाम करवा, प्राणायाम करताना पुढील मंत्र उच्चारावा
ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता । गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम् ॥
ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम् । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात् । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम देवादिकांना वंदन
( हात जोडून वंदन करावे ) व पुढील नावे उच्चारावीत
श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम:।वास्तुदेवताभ्यो नम: । शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥ कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम:। सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ नम: ॥ अविघ्नमस्तु ॥
या नंतर आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश, गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करावी पुढील मंत्र उच्चारावा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥
या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्डमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ॥२॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नम: ॥३॥
सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम् । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि: ॥४॥
तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते तेङघ्रियुगं स्मरामि ॥५
सर्वेष्वारब्धकाकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिद्धि: ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥
देश कालादींचे उच्चारण पुढीलप्रमाणे करावे. पुढील मंत्र उच्चारावा
ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये परार्धे विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्वीपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशत्याम् युगे । बौद्बावतारे । शालिवाहन शके 1944, शुभकृत् नाम संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ । कार्तिकमासे कृष्णपक्षे... अमावस्या तिथौ, सोमवार दिवसे, उत्तम दिवसे, हस्त नक्षत्रे, वैधुती योगे, चतू करणे, चंद्र तुला राशिप्रवेश, कन्या स्थिते वर्तमाने चन्द्रे । तुला स्थिते श्रीसूर्ये । मीन स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ आता आपले गोत्र आणि जन्मनाव उच्चार करावा
यानंतर पळी मध्ये पाणी घेऊन संकल्प सोडावा . पुढील मंत्र उच्चारावा
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ। समस्त दुरितोपशांत्यर्थ ।समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ । कल्पोतफलावात्प्यर्थ । मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय -किर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - महालक्ष्मी पूजा प्रीत्यर्थ
( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडावे.)
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्धयर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।
( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)
श्रीमहागणपति पूजन
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवून किंवा श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध,अक्षता, फु्ले इत्यदी वाहून पूजा करावी पुढील मंत्र म्हणावा.
सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।
नमस्कार करावा व पुढील मंत्र उच्चारावा
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे । कवि कवीनामुपमश्रवस्तमम। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं । श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥
गणपतीवर अक्षता वाहून त्याला आसन - अर्ध्य इत्यादी अर्पण करावे .
नंतर दोन विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर
'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय । ' अशी प्रार्थना करतात आणि ' श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडावेत.
या नंतर पुढील मंत्र उच्चारावा
ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम् सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु शिवाज्ञया ॥३॥
असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना टाकाव्यात.
षडंगन्यास पुढील मंत्र उच्चारावा
ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का उरु पादा उच्येते । हृदयाय नम:।
असे म्हणून हृदयाला हात लावावा. पुढील मंत्र उच्चारावा
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद वैश्य: पद्भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करावा. पुढील मंत्र उच्चारावा
ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत। शिखायै वषट्।
असे म्हणून डोक्याला स्पर्श करावा. पुढील मंत्र उच्चारावा
ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् । कवचाय हुं ।
असे म्हणून दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करावा . पुढील मंत्र उच्चारावा
ॐ सप्तास्यासन् परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन् पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट् । डोळ्यांना स्पर्श करावा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट् असे म्हणून टाळी वाजवतात व 'इति दिग्बंध:' असे म्हणतात.
कलशपूजा साठी पुढील मंत्र उच्चारावा
कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तु स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥ श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥
शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी.नमस्कार करावा .
शंखपुजा साठी पुढील मंत्र उच्चारावा
शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥ शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥
गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी.नमस्कार करावा .
घंटापूजासाठी पुढील मंत्र उच्चारावा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम् ॥ घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी. दीपपूजा - भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा .
यानंतर आपण आणलेला नवीन झाडू बाजूला ठेवून त्याला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा. व पुढील मंत्र उच्चारा
पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ।
श्री देवी महालक्ष्मी पूजन
यानंतर देवी लक्ष्मीची छोटी धातूची मूर्ती पूजेच्या ताटात घ्यावी व तिला जल अभिषेक करावा अभिषेक करताना पुढील श्रीसूक्तं म्हणावे
ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम्॥३॥
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्।
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम्॥४॥
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियंलोके देव जुष्टामुदाराम्।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्व:।
तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६॥
उपैतु मां देवसख: कीर्तिश्चमणिना सह।
प्रादुर्भुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृध्दिं ददातु मे॥७॥
क्षुत्पपासामलां जेष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
अभूतिमसमृध्दिं च सर्वानिर्णुद मे गृहात॥८॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्।
ईश्वरिं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥९॥
मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्री: श्रेयतां यश:॥१०॥
कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम।
श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम्॥११॥
आप स्रजन्तु सिग्धानि चिक्लीत वस मे गृहे।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टि पिङ्गलां पद्ममालिनीम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥
आर्द्रां य: करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीम्।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह॥१४॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्॥१५॥
य: शुचि: प्रयतोभूत्वा जुहुयाादाज्यमन्वहम्।
सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकाम: सततं जपेत्॥१६॥
पद्मानने पद्मउरू पद्माक्षि पद्मसंभवे।
तन्मे भजसि पद्मक्षि येन सौख्यं लभाम्यहम्॥१७॥
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने।
धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे॥१८॥
पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधस्त्वं॥१९॥
पुत्रपौत्रं धनंधान्यं हस्ताश्वादिगवेरथम्।
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे॥२०॥
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसु।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरूणं धनमस्तु मे॥२१॥
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृतहा।
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन:॥२२॥
न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामति:।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्॥२३॥
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांसुकगन्धमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीदमह्यम्॥२४॥
विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियाम्।
लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्॥२५॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥२६॥
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते।
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु:॥२७॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
॥इति श्रीसूक्तं समाप्तम॥
यानंतर देवीची मूर्तीला अक्षता वाहून त्याला आसन ठेवुन हा मंत्र उच्चारावा 'सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'। व तिला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा . श्री गणेश आणि देवी लक्ष्मीची आरती म्हणावी, सर्वांना प्रसाद वाटावा असे केल्यावर पूजाविधी संपूर्ण होतो.व नंतर घरासमोर फटाके फोडावे
संकलन पंडित श्री कुलदीपजी कुलकर्णी गुरुजी
टिप्पणी पोस्ट करा