DRDO CEPTAM 2022 : नोकरी शोधताय? मग डीआरडीओ मधील ही संधी सोडू नका, १ लाखांपर्यंत मिळेल पगार

 


ब्युरो टीम : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, CEPTAM ने स्टेनोग्राफर ग्रेड I, ज्युनिअर टेक्निशियन ऑफिसर, स्टेनोग्राफर ग्रेड II, प्रशासकीय सहाय्यक A, स्टोअर असिस्टंट A, सुरक्षा सहाय्यक A, वाहन ऑपरेटर A, फायर इंजिन ड्रायव्हर A आणि फायरमनच्या पदांच्या १०६१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती मिळेल पगार?

स्टेनोग्राफर ग्रेड-I-स्तर ६(रु. ३५ हजार ४०० - १ लाख १२ हजार ४००), ज्युनिअर ट्रान्सलेटर ऑफिसर- (JTO) स्तर ६(रु. ३५ हजार ४०० - १ लाख १२ हजार ४००), स्टेनोग्राफर ग्रेड-II- स्तर ४(रु. २५ हजार ५०० - ८१ हजार १००), प्रशासकीय सहाय्यक 'A' - स्तर २ (रु. १९हजार ९०० ते ६३ हजार २००), स्टोअर असिस्टंट 'A' - स्तर २ (रु. १९हजार ९०० ते ६३ हजार २००), सुरक्षा सहाय्यक 'A' - स्तर २ (रु. १९हजार ९०० ते ६३ हजार २००), वाहन चालक 'A' - स्तर २ (रु. १९हजार ९०० ते ६३ हजार २००), फायर इंजिन ड्रायव्हर 'A' - स्तर २ (रु. १९हजार ९०० ते ६३ हजार २००), फायरमन - स्तर २ (रु. १९हजार ९०० ते ६३ हजार २००)

अशी होईल निवड 

कॉम्प्युटर आधारित चाचणी,ट्रेड/कौशल्य/शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता चाचणी इ. आणि वर्णनात्मक पेपर या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अहवालानुसार, DRDO CEPTAM साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ७ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीचे तपशीलवार नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही DRDO च्या drdo.gov.in वेबसाइटला भेट देऊ शकता. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांदरम्यान आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने