निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हावर बंदी घातली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी केला असून. यामध्ये महाराष्ट्रातील अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी कोणालाही शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही.
ANI ने याबाबत वृत्त दिले आहे सध्याच्या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून चिन्हांची यादी दिली जाणार आहे. दोघांनाही वेगवेगळी चिन्हे दिली जातील ज्यातून ते एक निवडू शकतील. अशा परिस्थितीत दोन्ही गटांना प्राधान्यक्रम सांगण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे,
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेना (ठाकरे गट) यांची मागणी होती.
टिप्पणी पोस्ट करा