Govt. Recruitment भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती

 


संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी  भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), या संरक्षण मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील मिनी रत्न कंपनीने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. कंपनीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी, कॉम्प्युटर सायन्स, ऑप्टिक्स, बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्स आणि ह्युमन रिसोर्सेस विभागात ग्रेड 2 मध्ये 37 मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती केली जाणार आहे. या पदांवर सुरुवातीला 10.52 लाख वार्षिक वेतन दिले जाईल.

भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे जाहिरात केलेल्या विविध विभागांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट bdl-india.in च्या करिअर विभागात प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होईल आणि उमेदवार 28 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी तपशीलवार भरती अधिसूचना आणि अर्ज पृष्ठावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.

रिक्त्त पदांची संख्या पुढील प्रमाणे आहे  व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी मेकॅनिकल 10 पदे, इलेक्ट्रॉनिक्स 12 पदे, इलेक्ट्रिकल 3 पदे, मेटलर्जी 2 पदे, संगणक विज्ञान 2 पदे, ऑप्टिक्स 1 पद, व्यवसाय विकास 1 पद, वित्त 3 पदे, मानव संसाधन 3 पदे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने