भारतीय वायुसेना (IAF) आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (FASF) यांचा संयुक्त सराव

 


भारतीय वायुसेना (IAF) आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (FASF) 26 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जोधपूर एअर फोर्स स्टेशनवर 'गरुड VIl' नावाच्या द्विपक्षीय सरावात सहभागी झाले आहेत. या सरावात, FASF हे चार राफेल लढाऊ विमाने, एक A-330 मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (MRTT) विमान आणि 220 कर्मचार्‍यांच्या तुकडीसह भाग घेईल. तर भारतीय हवाई दल  सुखोई (Su-30 MKI), राफेल (Rafale), LCA  तेजस आणि जग्वार हि लढाऊ विमाने तसेच लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि Mi-17 हेलिकॉप्टर सह यात सहभागी होत आहे. IAF दलामध्ये फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट, (AWACS) आणि AEW&C सारख्या लढाऊ सक्षम मालमत्तेचा देखील समावेश असेल. हा संयुक्त सराव दोन्ही देशांना ऑपरेशनल क्षमता आणि इंटरऑपरेबिलिटी वाढविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, तसेच सर्वोत्तम पद्धती सामायिक करेल.

द्विपक्षीय सरावाची ही सातवी आवृत्ती आहे. पहिली, तिसरी आणि पाचवी आवृत्ती भारतात 2003, 2006 आणि 2014 मध्ये अनुक्रमे एअर फोर्स स्टेशन ग्वाल्हेर, कलाईकुंडा आणि जोधपूर येथे आयोजित करण्यात आली होती.तर दुसरी, चौथी आणि सहावी आवृत्ती 2005, 2010 आणि 2019 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या सरावात IAF आणि FASF च्या सहभागामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच व्यावसायिक संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि ऑपरेशनल ज्ञान वाढण्यास प्रोत्साहन मिळेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने