ICC T20 World Cup 2022 भारत आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळणार

 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे (India vs New Zealand). पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता, त्यामुळे येथे टीम इंडिया आज इतर काही बदल करण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यानंतर टीम इंडियाची  टी20 विश्वचषकातील ( ICC T20 World Cup 2022) खरी परीक्षा सुरू होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि नंतर शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली. आता न्यूझीलंडविरुद्ध, टीम इंडियाला रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार यांसारख्या मोठ्या खेळाडूंचे चांगले प्रदर्शन होईल अशी आशा आहे.

यजमान ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंड हा देखील एक बलाढ्य संघ आहे आणि तो स्पर्धेच्या विजेतेपदाचा एक प्रमुख दावेदार देखील आहे. आजच्या सामन्यात हवामान कोरडं राहणार असून पावसाची शक्यता नाही. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असून 180 ते 190 धावा साधारण या मैदानाची सरासरी धावसंख्या आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे, जिथे टीम इंडियाचा पहिला सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता. भारतीय वेळेनुसार, भारत-न्यूझीलंड सराव सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने