आता देशात एमबीबीएस (MBBS) चा अभ्यासक्रम हिंदीतूनही उपलब्ध

 


देशात आजपासून हिंदीतील वैद्यकीय शिक्षणाचा नवा अध्याय सुरू होत आहे. मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य असेल जिथे वैद्यकीय शिक्षण हिंदीत देखील उपलब्ध असेल. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आयोजित 'हिंदीमध्ये ज्ञान का प्रकाश' या कार्यक्रमात एमबीबीएस हिंदी अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले 'आजचा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या काळात जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. देशातील शिक्षण क्षेत्राच्या नवजागरणाचा हा क्षण आहे.'  या प्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील अमित शाह यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले 'आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर वैद्यकीय शिक्षण हिंदीतून होणार आहे. हिंदीतुन उपलब्द होणाऱ्या अभ्यासक्रमामुळे याचा फायदा बऱ्याच मुलांना होईल.

इतर अनेक देशांप्रमाणे आता मध्य प्रदेशातही वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतुन म्हणजेच हिंदीतून होणार आहे. इंग्रजी पुस्तकांचे हिंदीत भाषांतर करण्यासाठी 97 डॉक्टरांच्या चमूने 4 महिने मेहनत घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने