Navratri Culture: महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ श्री क्षेत्र कोल्हापूर.

 


महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे साधारण सहाव्या ते सातव्या शतकातले असून हे मंदिर प्राचीन काळातील एक उत्कृष्ट वास्तू कलेचा नमुना आहे. मंदिर परिसरात याबाबत माहिती देणारे अनेक शिलालेख आढळतात.हे हेमाडपंथी मंदिर वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे.मंदिरात महालक्ष्मी देवीची मूर्ती हि पश्चिमाभिमुख असून तिच्या एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात गदा आहे. शिरावर सोनेरी मुकुट असून मुकुटाच्या मागच्या बाजूस शेष नागाने छाया धरली आहे. दुसऱ्या एका हातात पानपात्र व म्हाळुंग फळ आहे. देवीच्या हातात  ढाल आणि गदा आहे. देवीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. श्री महालक्ष्मीने हिरव्या व लाल रंगाचे पातळ नेसलेली असून अलंकार घातलेले आहेत.(Mahalakshmi Mandir Kolhapur) 

महालक्ष्मी मंदिर हे त्रिकुट प्रसाद मानले गेले असून इथे महाकाली, अंबाबाई, महासरस्वती अशा तीन देवींचे मंदिरे एकाच ठिकाणी असल्याचे आढळते. दरवर्षी देवीचा नवरात्रौत्सव  व एप्रिल महिन्यातील रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची ही आराध्य देवता म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्ती पीठांपैकी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे एक महत्वाचे पीठ आहे. येथील स्थानिक नागरिक हे अंबाबाई नावाने देवीची आराधना करतात परंतु ताम्रपटापासून तर अनेल शिलालेख व इतर ग्रंथामध्ये महालक्ष्मी असाच उल्लेख आढळतो. त्यामुळे हे मंदिर  महालक्ष्मी नावाने प्रचलित आहे. याखेरीज महालक्ष्मी देवीस करवीर निवासिनी,व स्थानास करवीर क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते.

महालक्ष्मी बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी, ब्रम्ह देवाचा मानसपुत्र कोल्हासूर याचा वध आदिमायाने केला म्हणून या नगरीला कोल्हापूर असे नाव पडले तर करवीर माहात्म्यात करवीर हे महानगर वाराणशीहुन श्रेष्ठ असल्याने भक्तगण करवीर निवासानी अंबाबाई म्हणून सुद्धा देवीला हाक मारतात. करवीरक्षेत्रात सर्व जल शंभूरूप आहे. सर्व पाषाण जनार्धन रूप म्हणजेच विष्णुरूप आहे, येथील सर्व वाळूकण हे ऋषीमुनी आहेत आणि येथील सर्व वृक्ष देवता आहेत. सुरवातीला विष्णूक्षेत्र असलेले हे स्थान पुढे शक्तीच्या म्हणजे साक्षात महालक्ष्मीच्या आगमनाने शक्तियुक्त झाले. मानवांना भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारे हे शक्तीपीठ आहे. मंदिराच्या आवारात असलेले नवग्रह मंडप हा सुद्धा वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.  

 कारण महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम करतांना केलेल्या वैशिष्टयेपूर्ण रचनेमुळे येथे वर्षातून दोन वेळा किरनोत्सव होतो. मंदिराची उभारणी करतांना पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्याच वेळेत सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण यांची वास्तविक स्थिती व दिशा तंत्राचा अचूक वापर करून महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे दरवर्षी नऊ ते अकरा नोव्हेंबर या दरम्यान तसेच एक व दोन जानेवारी या दरम्यान अशा वर्षातून दोन वेळेत किरणोत्सव असतो. यात पहिल्या दिवशी सूर्याचे किरणे हे महालक्ष्मीचे चरणस्पर्श करतात, दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे हे कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे हे चेहऱ्यापर्यंत पोहोचतात. यावेळी आदिशक्ती अंबाबाई मातेच्या वंदनाला साक्षातसूर्य देवच आले आहे असा भास निर्माण होतो. म्हणून महालक्ष्मीचा हा दुर्लभ किरनोत्सव सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे जमा होतात. 

कोल्हापूर मंदिरात आढळणारे शिलालेख हे देवनागरी लिपीत कोरलेले आहेत. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीची मूर्ती हि अतिशय उच्च प्रतीच्या काळ्या रंगाच्या पाषाणापासून  बनवलेली आहे, त्यामध्ये हीरक नावाचा धातू वापरलेला आहे. यामुळे मूर्तीवर प्रकाशाचे किरणे पडला असता ती उजळून निघते. श्री महालक्ष्मीची मूर्तीची स्थापना करतांना मूर्तीवर वर्षातून दोनदा किरणोत्सव होईल याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मीची मंदिर नेमके कोणी उभारले यात अनेक मते मतांतरे असले तरी, मंदिराच्या वास्तुविशारदने मूर्तीच्या तयार करण्यापासून तर मंदिराची वास्तु पूर्ण उभारेपर्यंत सर्व गोष्टींचा अतिशय बारकाव्यांनिशी अभ्यास केलेला असावा याची प्रचती मिळते. 

कोल्हापूर मंदिरात नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणार्‍या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने