Navratri Puja: नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची देवीची पूजा करा

 


आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा सातवा दिवस असून असे मानले जाते की आज कालरात्रीची देवीची उपासना करणाऱ्या  भक्तांना वर्षभर भूत, प्रेत किंवा वाईट शक्ती जास्त त्रास देत नाहीत. आज कालरात्रीची देवीची विषयी जाणून घेऊ

आज देवीच्या सातव्या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन सहस्रार चक्रात स्थित असते. देवी कालरात्री दुष्टांचा नाश करते. तिचे रूप पाहण्यास अतिशय वेगळे आहे, परंतु देवी कालरात्री नेहमी तिच्या भक्तांना शुभ फल प्रदान करते, म्हणून तिला शुभंकारी असेही म्हणतात. देवी कालरात्रीचे वाहन गाढव असून तिला चार हात आहेत, त्यापैकी वरचा उजवा हात वरद मुद्रेत आहे आणि खालचा हात अभय मुद्रामध्ये आहे. वरच्या डाव्या हातात विळा आणि खालच्या हातात शस्त्र आहे.

कालरात्रीच्या पूजेच्या वेळी पेढ्याचा नैवेद्य दाखवावा, असे मानले जाते की यामुळे तुम्हला मानसिक शक्ती आणि शत्रूवर विजय मिळेल. तसेच, जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकलात तर तुम्हाला त्यातही जास्त त्रास होणार नाही. देवी कालरात्रीचा पुढील मंत्राचा आज जप करा.   

या देवी सर्वभूतेषु मां कालरात्रि रूपेण संस्थिता । 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने