संजू सॅमसनची झुंज अपयशी, भारताचा पहिल्या ODI मध्ये पराभव.

 


लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 40 षटकांच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 250 धावांचे लक्ष्य दिले होते, पण टीम इंडिया केवळ 240 धावा करू शकली. संजू सॅमसनने भारताकडून 86 धावांची दमदार खेळी केली आणि शेवटपर्यंत झुंज दिली. पण तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही, आणि भारताने सामना 9 धावांनी गमवावा भारत आता तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. पुढील सामना आता 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये होणार आहे.

टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 74 धावांची गरज होती, तेव्हा संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकूर क्रीजवर होते. दोघांनीही चांगले फटके मारले पण शार्दुल ठाकूर बाद झाल्यावर नंतर येणारे सर्व फलंदाज लवकर बाद होत गेले. भारताला शेवटच्या षटकात 30 धावांची गरज होती, संजू सॅमसनने 20 धावा केल्या. संजू सॅमसनने 86 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले.

संजू व्यतिरिक्त या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरने 50 धावा केल्या, तर शार्दुल ठाकूरने 31 धावा केल्या. टीम इंडियाची टॉप ऑर्डर आज अपयशी ठरली, शिखर धवन 4, शुभमन गिल 3 आणि ऋतुराज गायकवाड केवळ 13 धावा करू शकले. 20 धावांची खेळी करून इशान किशनही बाद झाला, त्यानंतर श्रेयस-संजूने संघाची धुरा सांभाळली.

पावसामुळे प्रभावित झालेला हा सामना 40 षटकांचा करण्यात आला, जेव्हा दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू झाली, तेव्हा त्याची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. 49 धावांवर आफ्रिकेने विकेट गमावली आणि पाहता पाहता 71 धावांवर तीन विकेट पडल्या. कर्णधार टेम्बा बावुमाचा फक्त 8 धावा करू शकला. क्विंटन डी कॉकने 48 धावांची खेळी खेळली, पण दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक्स क्लासेन यांनी अप्रतिम भागीदारी केली. दोघांनी नाबाद 139 धावा जोडल्या आणि संघाला 249 धावांपर्यंत नेले. डेव्हिड मिलरने 63 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 75 धावा केल्या. दुसरीकडे, हेनरिक क्लासेनने 65 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 74 धावा केल्या. या डावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 249 धावांपर्यंत मजल मारता आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने