महाराष्ट्र एटीएस ने जालना जिल्ह्यातून PFI संबंधित प्रकरणात 22वी अटक केली असून, अटक केलेला आरोपी शेख उमर शेख हबीब याला औरंगाबादच्या विशेष एनआयए न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली अशी माहिती महाराष्ट्र एटीएस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 22/09/2022 रोजी, महाराष्ट्रा एटीएसने बेकायदेशीर कारवाया केल्याबद्दल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या सदस्यांविरुद्ध 4 FIRS नोंदवले होते व यासंबंधात महाराष्ट्रातील विविध भागातून 21 आरोपींना अटक करण्यात आली होती.
एटीएसच्या पुढील तपासादरम्यान, ATS महाराष्ट्र ने जालना येथून याच संबंधात शेख उमर शेख हबीब (वय वर्ष 30) नावाच्या एका आरोपीला अटक केली असून. अटक केलेल्या आरोपीला सत्र न्यायाधीश (NIA विशेष न्यायालय) समोर हजर करण्यात आले असता. आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
टिप्पणी पोस्ट करा