सरकारी नोकरी भरती, रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), सेंट्रल रेल्वे (CR) ने स्टेनोग्राफर, सीनियर कॉमन क्लर्क कम तिकीट क्लर्क आणि इतर जागांसाठी भरतीची जाहिरात सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) द्वारे RRC CR भर्ती अधिसूचना 2022 जारी केली आहे. याद्वारे ते 596 रिक्त पदांची भरती करणार आहेत. यासाठी उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करावा.
अर्ज भरण्यास 28 ऑक्टोबर 2022 पासून सुरवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 28 नोव्हेंबर 2022 आहे. रिक्त जागांचा तपशील लघुलेखक 08, वरिष्ठ सह लिपिक सह तिकीट लिपिक 154, गुड्स गार्ड 46, स्टेशन मास्टर 75, कनिष्ठ खाते सहाय्यक 150, कनिष्ठ सह लिपिक कम तिकीट लिपिक 126, लेखा लिपिक 37 असा आहे तर यासाठी शिक्षण पात्रता 12 वी, पदवी असावी
वय श्रेणी सामान्य श्रेणी 42 वर्षे, इतर मागासवर्गीय 45 वर्षे व राखीव प्रवर्ग (SC/ST) 47 वर्षे अशी वयाची अट असून निवड प्रक्रियात लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, दस्तऐवज सत्यापन, वैद्यकीय चाचणी, याचा समावेश राहील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नोंदणी प्रमाणपत्र. अधिक माहिती साठी तुम्ही rrccr.com/Home/Home येथे भेट देऊन Online application for various post under GDCE quota. येथे अधिक माहिती पहा
टिप्पणी पोस्ट करा